Fly 91 Dainik Gomantak
गोवा

UPI Payment In Flight: आता विमानात खाद्यपदार्थांसाठी देता येणार ऑनलाईन पैसे; या कंपनीकडून UPI इन-फ्लाइट पेमेंटची सुविधा

UPI Payment Service In Flight: फ्लाय९१ कंपनीने युपीआयद्वारे इन-फ्लाइट पेमेंटची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. बहुतेक विमानसेवांमध्ये चेक-इन झाल्यानंतर जेवण बुक करता येत नाही.

Pramod Yadav

पुणे: फ्लाय - ९१  या प्रादेशिक विमानसेवेने आता प्रवाशांसाठी एक नवा सोयीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. प्रवासी विमान प्रवासादरम्यान खाद्यपदार्थ आणि पेये खरेदी करण्यासाठी युपीआय (UPI) द्वारे ऑनलाईन पेमेंट करू शकतात. यापूर्वी या सेवांसाठी केवळ रोख रक्कम स्वीकारली जात होती.

फ्लाय -९१ कंपनीने युपीआयद्वारे इन-फ्लाइट पेमेंटची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. बहुतेक विमानसेवांमध्ये चेक-इन झाल्यानंतर जेवण बुक करता येत नाही. मात्र, फ्लाय -९१ने या परंपरेला छेद देत प्रवाशांसाठी एक वेगळी सुविधा सुरू केली आहे. यानुसार प्रवासी आता उड्डाणाच्या दिवशी, अगदी चेक-इन केल्यानंतरही आपलं जेवण बुक करू शकतात. विमानतळावर काउंटरवर, बोर्डिंग गेटवर किंवा विमानात आपल्या सीटवर असलेला QR कोड स्कॅन करून ही प्रक्रिया पूर्ण करता येते.

फ्लाइट सुरू होण्यापूर्वी युपीआय(UPI)च्या माध्यमातून पेमेंट करता येत असल्याने ही सेवा अधिक सोयीची आणि जलद ठरते. फ्लाय - ९१ची ही नवी सुविधा प्रवाशांच्या सोयीसाठी एक मोठं पाऊल ठरत आहे.

"विमानात युपीआय(UPI)आधारित डिजिटल पेमेंटची सुरुवात ही आमच्या प्रवाशांसाठी अधिक सुविधा, लवचिकता आणि गरम जेवण उपलब्ध करून देण्याकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. फ्लाय९१ चा 'डिजिटल-फर्स्ट' उपक्रम एकसंध आणि कॅशलेस प्रवासासाठी आमची वचनबद्धता अधोरेखित करतो," असे फ्लाय - ९१ चे एमडी आणि सीईओ मनोज चाको म्हणाले.

फ्लाय९१ च्या मेनूमध्ये पोहे, उपमा, डाळ भात, बिर्याणी आणि नूडल्स असे चविष्ट गरम जेवण समाविष्ट आहे. चहा आणि कॉफीसारखे गरम पेय देखील प्रवाशांना घेता येऊ शकतात. हलक्या स्नॅक्ससाठी, चीज आणि मेयो डिपसह दिल्या जाणाऱ्या रागी चिप्स (मसाला आणि जलापेनो फ्लेवर्समध्ये), काजू आणि बदामांचे मिश्रण, चोको बदाम, चोको काजू आणि पीनट बटर सारख्या मजेदार फ्लेवर्समध्ये कुकीजसारखे अनोखे पर्याय आहेत. निवडण्यासाठी अनेक ज्यूस देखील आहेत - ज्यामध्ये सफरचंद डिलाईट, तिखट बिंबली, आंबा, जामुन आणि आम पन्ना यांचा समावेश आहे.

मार्च २०२४ पासून कार्यरत असलेले फ्लाय - ९१ सध्या गोव्याला पुणे, हैदराबाद, सिंधुदुर्ग, जळगाव आणि अगत्ती (लक्षद्वीप) शी जोडते आणि गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एटीआर ७२-६०० विमानांचा वाढता ताफा चालवते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Viral Video: पाकिस्तानी तरुणीची देशभक्ती पाहून लोक थक्क, स्वातंत्र्य दिनी गायलं 'भारतीय गाणं'; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT