Solapur Goa Flight 
गोवा

Solapur Goa Flight: सोलापूर - गोवा व मुंबई हवाई प्रवास लांबणीवर, आता कधी सुरु होणार विमान सेवा?

Solapur - Goa And Mumbai Direct Flight: येत्या २३ डिसेंबरपासून कंपनी विमानसेवा सुरु करणार होती. दरम्यान, दाट धुके असल्याकारणाने ही सेवा पुढे ढकलण्यात आली आहे.

Pramod Yadav

Solapur Goa Flight

सोलापूर: येथून गोवा आणि मुंबईसाठी सुरु होणारी थेट विमानसेवा पुढे ढकलली आहे. या सेवेसाठी आता सोलापूरकरांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. फ्लाय ९१ या विमान कंपनीने नव्या सेवेची घोषणा केली होती. दरम्यान, दाट धुक्यामुळे २३ डिसेंबर रोजी सुरु होणारी ही सेवा पुढे ढकलण्यात आली आहे.

मूळ गोमंतकीय विमान कंपनीने देशांतर्गत विमानसेवेला प्राधान्य देताना विविध शहरांना जोडणारी विमानसेवा सुरु करण्यावर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर ते गोवा आणि मुंबईसाठी थेट विमानसेवा सुरु करण्याची घोषणा कंपनीने केली होती. येत्या २३ डिसेंबरपासून कंपनी विमानसेवा सुरु करणार होती. दरम्यान, दाट धुके असल्याकारणाने ही सेवा पुढे ढकलण्यात आली आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर ते गोवा आणि मुंबई थेट विमानसेवा दाट धुक्यामुळे पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता हा निर्णय घेतलाय. धुक्याचा प्रभाव कमी झाल्यानंतर ही सेवा सुरु करण्यात येईल. कंपनीने प्रवाशांना दिलेला हा शब्द आहे. विमानसेवा सुरु होण्याची निश्चित तारीख अद्याप ठरवण्यात आलेली नाही, पण लवकरच बुकींगची माहिती प्रसिद्ध करण्यात येईल, असे फ्लाय -९१ कंपनीने म्हटले आहे.

फ्लाय ९१ कंपनीने गेल्या काही महिन्यांपूर्वी विमानसेवेची घोषणा केली. सुरुवातीच्या टप्यात अंदमान निकोबार बेटाला थेट कनेक्टिव्हिटी देणारी सेवा सुरु करण्यात आली. त्यानंतर कंपनीने पुणे, मुंबई, सोलापूर, जळगाव आणि सिंधुदुर्ग या महाराष्ट्रातील शहरांसाठी थेट विमानसेवेची घोषणा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT