Bicholim Dainik Gomantak
गोवा

Bicholim Corporation : डिचोली पालिकेला कॅनरा बँकेकडून ‘सीएसआर’ मधून फुलझाडांच्या कुंड्या

Bicholim Corporation : डिचोली शहरवासीयांनी फुलझाडांच्या कुंड्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन कुंदन फळारी यांनी केले. शहर कचरामुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन विजयकुमार नाईक यांनी केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim Corporation :

डिचोली, सामाजिक बांधिलकी उपक्रमाखाली (सीएसआर) कॅनरा बँकेकडून डिचोली पालिकेला फुलझाडांच्या मोठ्या कुंड्या देण्यात आल्या. पालिकेत आयोजित एका विशेष कार्यक्रमात या कुंड्या पालिकेच्या स्वाधीन करण्यात आल्या.

‘सीएसआर’अंतर्गत विविध प्रकारच्या फुलझाडांच्या ६० कुंड्या देण्यात आल्या आहेत.

यावेळी मुख्याधिकारी सचिन देसाई, नगराध्यक्ष कुंदन फळारी, उपनगराध्यक्ष दीपा पळ, नगरसेवक विजयकुमार नाटेकर, नीलेश टोपले, ॲड. रंजना वायंगणकर, सुखदा तेली, कॅनरा बँकेच्या डिचोली शाखेचे व्यवस्थापक सुहास माळी, अधिकारी सुषमा दोराईद आणि बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.

''सीएसआर'' उपक्रमाखाली कॅनरा बँकेतर्फे शिक्षण आदी क्षेत्रांत वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात, असे सुहास माळी यांनी यावेळी सांगितले.

फुलझाडांच्या कुंड्या देण्याचा बँकेचा उपक्रम स्तुत्य आहे, असे सचिन देसाई यांनी सांगून फुलझाडांच्या कुंड्यामुळे शहरातील स्वच्छता आणि सौंदर्यात भर पडणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

डिचोली शहरवासीयांनी फुलझाडांच्या कुंड्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन कुंदन फळारी यांनी केले. शहर कचरामुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन विजयकुमार नाईक यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT