Flood in Canacona
Flood in Canacona  Dainik Gomantak
गोवा

काणकोणमध्ये तुफान पाऊस; रस्ते पाण्याखाली

सुभाष महाले

काणकोण : दक्षिण गोव्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून काणकोणमध्ये आतापर्यंत 58.74 इंच पावसाची नोंद झाली आहे. आज सकाळी 8 वाजता संपलेल्या चोवीस तासांत काणकोणात 4.37 इंच पावसाची नोंद जलस्त्रोत खात्याने केली आहे. काणकोणची तहान भागवण्याऱ्या चापोली धरण जलाशयात 36.15 मीटर म्हणजे 875.97 पाणीसाठा तयार झाला आहे. धरण जलाशयाची पाणी धारण करण्याची क्षमता 38.75 मीटर्स आहे.

सततच्या पावसामुळे यंदा दुसऱ्यांदा पैंगीण ते गालजीबाग रस्त्याला जोडणाऱ्या आदिव्हाळ या मार्गावर गुडघाभर पाणी साचलं होतं. त्याचप्रमाणे जोरदार पाण्याचा प्रवाह वाहत असल्याने पहाटेपासून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. पैंगीणमधून गालजीबाग आणि गालजीबाग येथून वेगवेगळ्या भागात जाणाऱ्या रहिवाशांची मात्र यामुळे कुचंबणा झाली. त्यांना मनोहर पर्रीकर मार्गाने माशे येथून पैंगीण गाठावे लागले. गालजीबाग नदीचे पात्र गाळ साचून उथळ बनले असल्याने तिची पाणी वाहून नेण्याची क्षमता क्षीण झाल्याचं बोललं जात आहे.

केपे येथील कुशावती नदीला पूर आला असून पारोडा येथे पुलावरून पाणी वाहू लागल्याने रस्ता आणि नदीचे पाणी समान पातळीवर आले आहे. या पाण्याचा प्रवाह प्रचंड असून या मुळे या नदीच्या काठावर असलेल्या पारोडा आणि अवेडे या गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे.

देऊळमळ केपे येथेही कुशावती नदीची पातळी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. ही नदी आता प्रचंड वेगात दुथडी वाहू लागली आहे.

दरम्यान पारोडा येथे रस्ता पाण्याखाली गेल्याने मडगाव - सांगे दरम्यानची वाहतूक चांदर मार्गे वळविण्यात आली आहे. यामुळे कित्येक बस चालकांनी आपल्या बसेस रस्त्यावर न आणल्याने सामान्य वाहतुकीवर ताण आला आहे. बसेस कमी असल्याने प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: भागीदारीच्या नावाखाली 35 लाखांचा गंडा तर, पर्वरीत पर्यटकांच्या खोलीत 3 लाखांची चोरी

Goa News : समान नागरी कायदाप्रश्‍नी मोदींकडून गोव्याचे कौतुक

Dabolim Airport: भारतीय नौदलाच्या विमानाचे दाबोळीवर आपत्कालीन लँडिंग, चार फ्लाईट्स वळवल्या

Ponda News : ८४ रोजंदारी कामगारांचा पगार देणार; फोंडा पालिका बैठकीत निर्णय

Kyrgyzstan Violence: किर्गिस्तानमध्ये जमावाकडून 4 पाकिस्तानी विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या, दूतावासाकडे जीवाची भीक मागितली पण...

SCROLL FOR NEXT