Sattari Flood Dainik Gomantak
गोवा

Sattari Flood: पूरस्थितीमुळे सत्तरी हादरली; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

Goa Rain: रस्ते पाण्याखाली, घरांना पाण्याचा वेढा, जोर वाढल्यास स्थिती भयानक होण्याची शक्यता

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई: जंगल खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सत्तरीतील वेळूस, रगाडा, म्हादई, वाळवंटी तसेच इतर नाले-ओहोळांना पूर आल्याने गुरुवारी दिवसभर भयानक स्थिती निर्माण झाली होती. परंतु दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्याने स्थिती नियंत्रणात येऊ लागली आहे. मात्र पावसाचा जोर वाढल्यास स्थिती पुन्हा भयानक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

बुधवारपासून पावसाचे जोर धरला होता. रात्रभर तुफान बरसात झाल्याने नदी नाले पातळी ओलांडून वाहू लागले. पहाटे सहाच्या सुमारास अचानक पाण्याची पातळी वाढली, त्यामुळे हाहाकार उडाला. शाळकरी मुले तसेच नोकरी धंद्यासाठी दूर गावी जाणारे रस्ते पाण्याखाली गेल्याने अडकून पडले.

नदीच्या पुराचे पाणी वाळपई कदंब बस स्थानकासमोर आल्याने येथील प्रशांत मयेकर यांचे घर पाण्याखाली गेले. त्यामुळे मयेकर यांना लाखांचे नुकसान झाले आहे. या कुटुंबाला सध्या समान सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

स्थानिक नगरसेवक रामदास शिरोडकर, ग्रामस्थ व अग्निशमन दलाचा जवानांनी मदत कार्य केले. तसेच येथील मणेरकर यांच्या घरातही पाणी शिरले. तसेच तुकाराम हळदणकर यांची भात शेती पुराचा पाण्यात वाहून गेली. एकूण १ एकर जमिनीत त्यांनी भात शेती केली होती.

मासोर्डे, बांद नदी काठी असलेली गणपती विसर्जन शेड पाण्यात वाहून गेली.तसेच येथील रस्ताही पाण्याखाली गेला. येथील नवीन फुटबॉल मैदानही पाणी साठले.

वेळूस नदीला पूर आल्यामुळे वाळपई-नगरगाव रस्ता पाण्याखाली गेला. तसेच रामा गावकर त्यांचे घर व बागायत पूर्ण पाण्याखाली जाऊन लाखांचे नुकसान झाले. वेळूस-नगरगाव रस्ता पाण्याखाली गेल्याने नागरिकांचा संपर्क तुटला. त्यामुळे शाळकरी मुलांची धांदल झाली. यानंतर काहींनी दाबोस मार्गे वाळपई गाठली.

नाणूस येथील जय श्रीराम गोसंवर्धन केंद्राकडे पुरामुळे धोका निर्माण झाला. यावेळी तातडीने येथील गुरे सुरक्षित स्थळी हलविण्यात आली. कणकिगे येथे पुलाजवळ ६ वीज खांब उन्मळून पडले. त्यामुळे वीज पुरवठ्यावरपरिणाम झाला.

सावर्डे, येथे रस्ता पूर्ण पाण्याखाली गेला होता. मोर्ले बागवाडा तसेच घोटेली, केरी येथे वाळवंटीला पूर येऊन पुला व रस्ता पाण्याखाली गेला. अनेकांच्या शेती बागायतीत पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी झालेली आहे.

अधिकाऱ्यांकडून स्थितीचा आढावा

उत्तर गोवा जिल्हाधिकारी प्रवीण परब, उपजिल्हाधिकारी वांगणकर, मामलेदार, जलसिंचन खात्याचे अधिकारी, कृषी अधिकारी विश्वनाथ गावस आदींनी तालुक्यातील पूरग्रस्त भागात भेट देऊन स्थितीचा आढावा घेतला. तसेच आवश्‍यक मदत कार्य केले. पूर स्थितीमुळे वाळपई अग्निशमन दलाची धावपळ वाढली आहे. जवान अविश्रांत मदतकार्यात गुंतले दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT