Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: सुर्ल येथे फेरीधक्क्याजवळ आढळला ज्येष्ठ व्यक्तीचा मृतदेह, मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यात

Bicholim News: सुर्ल येथील फेरीधक्क्याजवळ बुधवारी (ता.१९) सकाळी नदीत तरंगताना एका ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह आढळून आला.

Sameer Amunekar

डिचोली : सुर्ल येथील फेरीधक्क्याजवळ बुधवारी (ता.१९) सकाळी नदीत तरंगताना एका ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्ती तिशान-कोठंबी येथील असून उल्हास विनायक नाईक (६१) असे त्यांचे नाव आहे.

मयताच्या नाकाला जखम झाल्याचे आढळून आले असून, तोल जाऊन ते नदीत पडले असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी पोलिस तपास करीत आहेत. याबाब माहिती मिळताच, डिचोली अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह नदीबाहेर काढून डिचोली पोलिसांकडे सुपुर्द केला.

अग्निशमन दलाचे लिडींग फायर फायटर महेश डी. नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल नाईक (चालक ऑपरेटर), आशीष मोर्लेकर, योगेश माईणकर, संजय उसपकर, अनुप नाईक आदी जवानांनी ही कामगिरी केली.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठविला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कृष्णाजी गावस पुढील तपास करीत आहेत.

उल्हास नाईक यांचा मृत्यू अपघातानं झाला की अन्य काही कारण आहे, याबाबत डिचोली पोलिस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT