Airport Bad Weather Canva
गोवा

Mopa Airport: खराब हवामानामुळे 'लॅन्डिंग' बंगळूरात; प्रवाशांचे हाल

Kempegowda Airport Bangalore: मोपाऐवजी थेट बंगळुरूकडे वळविली वाहतूक

गोमन्तक डिजिटल टीम

खराब हवामानामुळे कमी दृष्टमानतेचे कारण पुढे करून ऐनवेळी सोमवारी मध्यरात्री मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणारे विमान बंगळूर केंपेगौडा विमानतळावर उतरवल्याने तेथे १४० प्रवाशांना दिवसभर ताटकळत राहावे लागले. रात्री ११ वाजेपर्यंत हे प्रवासी गोव्यात पोचले नव्हते.

अलीकडे अशी मोपावरील विमाने इतरत्र वळविण्यामागे तेथे ‘इन्स्ट्रुमेंट लॅण्डिंग’ सुविधा कारण आहे. हा विषय विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित करणार असल्याचे आमदार मायकल लोबो यांनी म्हटले आहे.

दोहा कतारवरून कतार एअरवेजचे हे विमान गोव्यात येत होते. नियोजित वेळेनुसार ते मोपा विमानतळावर सोमवारी मध्यरात्री १.५५ वाजता उतरणार होते. विमानाला आधीच उशीर झाला होता.

रात्री २ च्या सुमारास ते मोपा विमानतळाच्या कक्षेत आल्यावर पायलटांना मोपा येथील विमानतळावर पावसाळी हवामानामुळे दृष्यमानता अत्यंत कमी असल्यामुळे विमान बंगळुरूला नेण्याची सूचना करण्यात आली. एव्हाना दोहापासूनच्या प्रवासामुळे कंटाळलेल्या प्रवाशांनी आवराआवर सुरू केली होती. आणखी काही मिनिटांत गोव्यात उतरू, अशीच सर्वांची भावना होती.

विमानात १४० प्रवासी होते. त्यात बहुतांश गोमंतकीय होते. तेवढ्यात पायलटांनी विमान बंगळुरूकडे वळविण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यावेळी मोपा नाही तर दाबोळी का नाही, असा प्रश्‍न प्रवाशांनी केला. मात्र, विमानातील कर्मचाऱ्यांकडून आम्हाला हवाई नियंत्रण कक्षाकडून विमान बंगळुरूला न्या, असा आदेश असल्याचे सांगण्यात आले. प्रवाशांनाही आता प्राप्त स्थितीला सामोरे जाण्यापासून पर्याय नसल्याचे लक्षात आले आणि ती चर्चा तेथेच विरली.

हे विमान बंगळुरूहून मंगळवारी रात्री १०.०५ वाजता मोपा विमानतळावर येण्यासाठी निघेल, असे नियोजन होते. दिवसभर तेथून उड्डाणासाठी धावपट्टी खुली मिळू शकली नव्हती. मात्र, रात्री ११ वाजेपर्यंत हे विमान मोपा येथे उतरल्याची माहिती मिळाली नव्हती. हवामानाचा हा फटका १४० प्रवाशांना सक्तीच्या बंगळुरू मुक्कामाच्या रूपाने भोगावा लागला आहे.

दरम्यान, आमदार मायकल लोबो यांनीही, असे प्रकार वारंवार घडू लागले असून मलाही असा अनुभव आला होता, असे म्हटले आहे.

दाबोळीवरही दृश्यमानता कमी

हे विमान बंगळुरूला हलविल्याने ‘इन्स्ट्रूमेंट लॅण्डिंग सिस्टीम’ चर्चेत आली असली तरी ही यंत्रणा जुलै २०२२ मध्येच मोपा विमानतळावर बसविली आहे, अशी माहिती मिळाली आहे. दाबोळी आणि मोपा ही विमानतळे एकाच हवामान पटट्यात असल्याने मोपावर दृश्यमानता कमी असते, तेव्हा दाबोळीवरही तशीच स्थिती असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT