Dabolim Airport: ‘दाबोळी’ बंद करण्‍याचेच कारस्‍थान : खासदार विरियातोंचा आरोप

Dabolim Airport: ‘कतार एअरवेज’ची शुक्रवारपासून मोपावर सेवा, दक्षिणेत परिणाम शक्य
Viriato Fernandes
Viriato FernandesDainik Gomantak

Dabolim Airport

युके आणि इतर युरोपात स्‍थायिक असलेल्‍या गोमंतकीयांना गोव्‍यात येण्‍यासाठी सर्वांत पसंतीची विमान कंपनी म्‍हणून ज्‍या कतार एअरवेजकडे पाहिले जात होते, त्‍या विमान कंपनीची दाबोळीवरील उड्डाणे बंद केली असून शुक्रवार २१ पासून ही सेवा मोपावर सुरू केली आहे. त्‍यामुळे कित्‍येक विदेशस्‍थ गोमंतकीय नाराज झाले आहेत.

हा प्रकार म्हणजे दाबोळी विमानतळ बंद करण्‍याचे कारस्थान आहे, असे मत खासदार विरियातो यांनी व्यक्त केले.

सरकारचे दाबोळी विमानतळ बंद करण्‍यासाठीचे हे पहिले पाऊल असून गोमंतकीयांवर अन्यायकारक असा महत्‍वाचा मुद्दा आपण लोकसभेत मांडणार आहे. खाजगी व्यवस्थापन असलेल्या उत्तर गोव्यातील मोपा विमानतळावर विमान कंपन्यांना स्थानांतरित करण्यासाठी दबाव आणला जात आहे, असेही विरियातो म्हणाले.

गोवा सरकारच्या मंत्र्यांनी यापूर्वी केलेल्या विधानांमध्ये जीएमआरकडून एअरलाइन ऑपरेटर्सवर दाबोळी विमानतळ सोडण्याचा दबाव असल्याचे स्पष्ट केले आहे.

मोठ्या एअरलाइन कंपन्या मोपा विमानतळावर आपले ऑपरेशन्स स्थलांतरित करत असल्याने दाबोळी विमानतळ हळूहळू मृत होईल, असे आमचे भाकीत खरे ठरत आहे, असे फर्नांडिस म्हणाले.

ते पुढे म्हणाले, मोठ्या एअरलाइन कंपन्यांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीला कारणीभूत ठरेल, विशेषतः दाबोळी विमानतळावरील ग्राउंड स्टाफ आणि इतर कामगारांवर परिणाम होईल. या हालचालीमुळे एअरलाइन उद्योगाशी संबंधित व्यवसायांवर, विशेषतः शॅक्स, स्टार हॉटेल्स आणि दक्षिण गोव्यातील लहान आउटलेट्सवर परिणाम होणार आहे.

या प्रकरणी गोव्याचे लोक सरकारला जबाबदार धरतील. लवकरच गोव्यातील जनता भाजपला चांगला धडा शिकवेल. सोशल मीडियावर हे नवीन आंदोलन गाजत आहे. विमान कंपन्यांनाही किंमत मोजावी लागू शकते, असे फर्नांडिस म्हणाले.

Viriato Fernandes
Goa Top News: उसगावात दोन अपघात, पर्वरी उड्डाणपूल, कुळे येथील आग; गोव्यातील ठळक बातम्या

बहिष्काराचा निर्णय

लोकशाही सरकारमध्ये लोकशक्ती ही सर्वोच्च असते. सोशल मीडियावर एक नवीन आंदोलन सुरू झाले आहे, जिथे गोवेकरांनी कतार एअरवेजचा बहिष्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.

युरोप आणि गल्फ क्षेत्रात प्रवास करण्यासाठी या एअरलाइनवर अवलंबून असलेल्या लोकांकडून एअरलाइनला परिणामांचा सामना करावा लागेल. गोवेकरांनी एकमेकांना दाबोळी विमानतळावरून ऑपरेटर होणाऱ्या पर्यायी एअरलाइनचा वापर करण्याचे आवाहन केले आहे, फर्नांडिस म्हणाले.

लोकसभेत प्रश्‍न मांडणार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कतार दौऱ्याच्या दोन दिवसांनंतर कतार एअरवेजने दाबोळी विमानतळावरून खाजगी मोपा विमानतळावर ऑपरेशन्स स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतल्याने निराशा वाटते. भाजप सरकार स्थानिक गोवेकरांच्या हितापेक्षा भांडवलदारांच्या फायद्याला प्राधान्य देत आहे. परंतु, मी गोवाकरांना निराश होऊ देणार नाही. दाबोळीसाठी गोवेकरांचा प्रश्‍न लोकसभेत मांडणार आहे, असे ही विरियातो म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com