Mormugao News Dainik Gomantak
गोवा

''स्वातंत्र्य सैनिकांनी सर्वस्वाचा त्याग करून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले''

मुरगाव हिंदू समाजाच्यावतीने ध्वजारोहन उत्साहात

दैनिक गोमन्तक

वास्को: मुरगाव हिंदु समाजाच्यावतीने स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 8.30 वाजता मुरगाव हिंदू समाजाने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर चिखली गोवा येथे, मुरगाव हिंदू समाजाचे अध्यक्ष श्री नारायण (नाना) बांदेकर यांच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. (Flag hoisting on behalf of Mormugao Hindu community)

स्वातंत्र्य सैनिकांनी सर्वस्वाचा त्याग करून आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून दिले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारतीयांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या रूपाने आपला पहिला पंतप्रधान निवडला गेला, ज्यांनी राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीतील लाल किल्यावर प्रथमच तिरंगा ध्वज फडकवला. प्रत्येक भारतीय हा खास दिवस एखाद्या सणासारखा साजरा करतो, असे श्री नाना बांदेकर म्हणाले.

मुरगाव हिंदू समाजाचे सभासद श्री चंद्रकांत गावस याने आपले विचार व्यक्त केले. १५ ऑगस्ट, स्वतंत्र दिन हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी खूप महत्वाचा दीडशे वर्षाचे पाहिलेले स्वप्न या दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी प्रत्येक्षात आले आणि भारताला परकीय सतेच्या जोखडातून सोडविण्यात आपल्या स्वतंत्रविरांना यश आल्याचे सांगण्यात आले.

संस्थेचे उपाध्यक्ष श्री शेखर खंडपकर याने सर्वांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रकाश गावस याने तर आभार प्रदर्शन श्री वामन चोडणकर यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री नारायण (नाना) बांदेकर, उपाध्यक्ष श्री शेखर खडपकर यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa School Closed: गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले; शुक्रवारी शाळांना सुट्टी जाहीर

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

SCROLL FOR NEXT