सांडपाणी Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 'एसटीपी'साठी जागा निश्चित

खंडपीठात माहिती: तातडीने पावले उचलण्याचे निर्देश, विलंबनाची दखल

दैनिक गोमन्तक

पणजी: पर्वरी येथे सांडपाणी निचरा संयंत्रासाठी (एसटीपी) जागा शोधण्यास होत असलेल्या विलंबाची दखल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने घेतल्यानंतर सरकारी यंत्रणा गतिमान झाली. सुकूर येथे या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध केल्याची माहिती आज सांडपाणी साधनसुविधा विकास महामंडळ लि.ने (एसआयडीसीएल) स्थिती अहवाल सादर करून दिली. या प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेऊन तातडीने पावले उचलण्याचे निर्देश खंडपीठाने दिले.

पर्वरी येथील सांडपाणी निचरा संयंत्रासाठी जागा मिळण्यात अडचणी येत असल्याचे कारण देऊन हा प्रकल्प कित्येक वर्षांपासून पडून रखडला होता. तो गतिमान करण्याचे निर्देश देण्याची विनंती याचिकादार रोहन अशोक खंवटे यांनी दाखल केली होती. मागील सुनावणीवेळी गोवा खंडपीठाने 23 फेब्रुवारी रोजी दिलेल्या आदेशात या संयंत्रासाठी जागा शोधण्यासंदर्भातील निर्णय पुढील सुनावणीवेळी कळवण्याचे निर्देश सरकारला दिले होते. त्यानुसार आज सरकारतर्फे स्थिती अहवाल सादर करण्यात आला.

सुकूर येथील सर्वे क्रमांक 69 च्या उपविभागाच्या भाग 1,2 व 4 मध्ये जागा शोधण्यात आली आहे. भूसंपादन कायद्याखाली असलेल्या सरकारच्या धोरणानुसार ही जमीन ताब्यात घेण्यात येणार आहे. सरकारने या जागेसाठी मंजुरी दिली आहे, असे अहवालात एसआयडीसीएलच्या व्यवस्थापकीय संचालकांनी नमूद केले आहे.

आतापर्यंत 124.53 कोटी खर्च

या सांडपाणी प्रक्रिया संयंत्राच्या कामासाठी येणाऱ्या अडचणी खंडपीठासमोर मांडण्याऐवजी त्यावर तोडगा काढून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करावा. सांडपाणी निचरा प्रकल्प राबवण्यासाठी आतापर्यंत सुमारे 124.53 कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे यापुढे आणखी कोणतीही कारणे नकोत. कारण हा प्रकल्प जनहिताचा आहे. या प्रकल्पाच्या कामाचा पुढील स्थिती अहवाल जाणून घेण्यासाठी ही सुनावणी 11 एप्रिलपर्यंत तहकूब केल्याचे खंडपीठाने निर्देशात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT