गोव्यात निवडणुकीची उत्‍सुकता शिगेला; उमेदवारांत धाकधूक

मतमोजणीची जय्‍यत तयारी: कडक बंदोबस्‍त; सीसीटीव्‍हीचीही करडी नजर
Goa Election | Goa assembly election 2022 results News
Goa Election | Goa assembly election 2022 results NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: विधानसभा निवडणुकीसाठी यंदा प्रथमच निवडणूक आयोगाने मोठी आणि जय्‍यत तयारी केली असून 40 ही जागांची मतमोजणी एकाच वेळी सुरू होणार आहे. दक्षिण गोव्यातील 21 मतदारसंघांतील मतमोजणी मडगाव येथील दामोदर महाविद्यालयात तर उत्तर गोव्यातील 19 मतदारसंघांतील मतमोजणी पणजी येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये होणार आहे. यासाठी सुमारे दीड हजारांपेक्षा जास्त कर्मचारी तैनात केले असून तेवढाच पोलिस बंदोबस्त ठेवण्‍यात आला आहे. दरम्‍यान, मतमोजणीच्‍या पार्श्वभूमीवर उमेदवारांमधील चलबिचल वाढली आहे.

Goa Election | Goa assembly election 2022 results News
गोवेकरांनी तृणमूलवर दाखवला अविश्वास

यंदा 11 लाख 64 हजार 298 मतदारांपैकी 9 लाख 26 हजार 848 मतदारांनी प्रत्यक्ष इव्हीएमच्या साहाय्याने मतदान केले आहे. ही टक्केवारी 79.61 टक्के इतकी आहे. याशिवाय 80 वर्षांवरील 10 हजार 752 मतदारांना बॅलेट पेपर देण्यात आले होते. त्यापैकी 10 हजार 274 नागरिकांनी बॅलेट पेपर सादर करत मतदान केले आहे. तर, 13 हजार 115 कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. पैकी 12 हजार 547 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी सर्वाधिक मतदान साखळी मतदारसंघांत 89.63 टक्के इतके झाले आहे तर सर्वांत कमी मतदान बाणावली मतदारसंघात 71.37 टक्के इतके झाले आहे.

दरम्‍यान, मतमोजणीच्‍या पार्श्वभूमीवर उमेदवारांमध्‍ये धाकधूक वाढली आहे. काही प्रस्‍थापिक राजकारण्‍यांचे धाबे दणाणले असून त्‍या मतदारसंघांतून अनपेक्षित निकाल येऊ शकतात. काहींनी मात्र विजयाचा आनंद आधीपासून सुरू केला आहे.

Goa Election | Goa assembly election 2022 results News
पणजीत भाजपने गड राखला; उत्पल पर्रीकर पराभूत

त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था

मतमोजणीसाठी आयोगाने यंदा त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. पहिल्या टप्प्यात स्थानिक पोलिस तर दुसऱ्या दोन टप्प्यांसाठी केंद्रीय सशस्त्र पोलिस दल तैनात केले आहे. मतदानकेंद्राच्या परिसरात 144 हे जमावबंदीचे कलम लागू केले असून दिवसभर पूर्णत: दारूबंदी असेल. शिवाय मतमोजणी केंद्राचा परिसर पूर्णतः सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. सुरुवातीला बॅलेट पेपरची मोजणी होईल. त्यानंतर 8.30 वाजता इव्हीएम मशीनच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. हा सर्व निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरही उपलब्ध असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com