Road Accident in Goa |Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: कालचा वार अपघातवार ! राज्यात पाच वेगवेगळ्या ठिकाणी भीषण अपघात

काल राज्यात भीषण अपघातांमध्ये 5 जणांचा मृत्यु झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Road Accident in Goa: पर्रा-साळगाव खुरसाकडे येथील चार रस्ता जंक्शनवर दोन दुचाकींमधील अपघातात जखमी झालेले दुचाकीस्वार सत्पुरुष वासुदेव साळगावकर (वय 42,रा. थिवी) यांचा उपचाराअंती मृत्यू झाला.

संशयित दुचाकीस्वारांनी अपघात होताच घटनास्थळावरून पळ काढला. सत्पुरुष हे बसचालक असून कळंगुट-पणजी मार्गावर प्रवासी बस चालवायचे.

हा अपघात बुधवारी सकाळी 7 च्या सुमारास घडला. सत्पुरुष हे क्रमांकाच्या मोटारसायकलवरून पर्राहून साळगावच्या दिशेने जात होते, तर दोघे संशयित मोटारसायकलवरून गिरी ते नागवाच्या दिशेने जात होता.

दोन दुचाकींच्या धडकेत एक ठार

लिंगाभाट-पर्रा येथे वळणावर काल सायंकाळी दोन दुचाकींची धडक होऊन एक दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. राजेश मुंडा (27, रा.पर्रा व मूळ आसाम) असे मृताचे नाव आहे. तर दुसरा दुचाकीस्वार करण चोडणकर (रा. मये) हा किरकोळ जखमी झाला.

गुळे येथे एक दगावला, एक जखमी

आगोंद : गुळे-आगोंद या अंतर्गत रस्त्यावर काल दुपारी एकच्या सुमारास झालेल्या दुचाकी अपघातात काजूमळ, साळेरी-खोला येथील सिद्धार्थ नाईक (वय 44 वर्षे) यांचा मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेले कल्याण येथील अरविंद गायकवाड हे जखमी झाले.

काजूमळ, साळेरी-खोला येथील सिद्धार्थ नाईक हे आगोंदहून गुळे येथे जाताना दुचाकीवरील नियंत्रण सुटून तिने रस्त्याकडेच्या झाडाला ठोकरल्याने नाईक गंभीर जखमी झाले. त्यांना इस्पितळात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

वीज खांबाला धडक : एक ठार

मडगाव : नावेलीहून मडगावच्या दिशेने येताना वाटेत दुचाकीची वीज खांबाला धडक बसल्याने रमेश वडार (वय 28 वर्षे) या युवकाचा मृत्यू झाला.

दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दुचाकीवर मागे बसलेल्या महमद शेख याच्या पायाचे हाड मोडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बुधवारी दुपारी हे दोघे सिकेटी-नावेलीहून कोरडे येथे जात असताना हा अपघात घडला. वडार याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती विजेच्या खांबाला धडकली. रमेश याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी वाहन चालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT