Illegal Boating Dainik Gomantak
गोवा

Illegal Tourist Boats: बेकायदा पाच पर्यटक बोटी जप्त; कॅप्‍टन ऑफ पोर्टस्‌ची कारवाई

आवश्यक परवाने नसताना व क्षमतेपेक्षा जास्त पर्यटकांना बसवून जलसफर करणाऱ्या पाच पर्यटक बोटी कॅप्टन ऑफ पोर्टस्‌ने जप्त केल्या.

दैनिक गोमन्तक

Illegal Tourist Boats: आवश्यक परवाने नसताना व क्षमतेपेक्षा जास्त पर्यटकांना बसवून जलसफर करणाऱ्या पाच पर्यटक बोटी शुक्रवारी (ता.20) सिकेरी-कांदोळी येथे कॅप्टन ऑफ पोर्टस्‌ने जप्त केल्या. मरिन निरीक्षकांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले.

उपलब्ध माहितीनुसार, या बोटचालकांकडे आवश्यक परवाने नव्हते. हे चालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करत होते. याची तक्रार कॅप्टन ऑफ पोर्टसकडे आल्याने शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता सिकेरी-कांदोळी येथे अचानक छापा टाकून ही कारवाई केली.

गोव्यात सध्या पर्यटन हंगाम सुरू असून अनेक पर्यटक भेट देतात. याचा गैरफायदा घेत काही बेजबाबदार ऑपरेटर्स क्षमतेपेक्षा जास्त पर्यटकांना जलसफर घडवून आणत.

सर्व बोटी एकाच मालकाच्या

या जप्त केलेल्या सर्व बोटी एकाच मालकाच्या असून तो परदेशात असतो, असे सूत्रांनी सांगितले. संबंधित चालकांकडे प्रवासी बोट चालविण्याचा परवाना नव्हता.

ज्या कामगारांना बोट चालविता येते किंवा पोहता येते, अशांनीच या बोटी चालवायच्या असतात. त्यानुसार कॅप्टन ऑफ पोर्टसने या बोटी जप्त केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

UTAA: प्रकाश वेळीपना धक्‍का! ‘उटा’च्या विद्यमान समितीवर निर्बंध; सभा-आर्थिक व्‍यवहार करण्यास मनाई

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT