Inspector General of Police Rajesh Kumar Dainik Gomantak
गोवा

मतदान शांततेत; मात्र पाच गुन्ह्यांची नोंद: पोलीस महानिरीक्षक राजेश कुमार

मतदानादरम्यान 8610 पोलिस होते तैनात

दैनिक गोमन्तक

Goa Elections 2022: आज गोव्यात शांततेने मतदान पार पडले असले तरी पाच गुन्ह्यांची नोंद झाली असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक राजेश कुमार (Inspector General of Police Rajesh Kumar) यांनी दिली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोलवा येथे मतदान करण्यासाठी रोख रक्कम वाटत असताना पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याच्याकडून 1 लाख 19 हजार 270 रुपये जप्त केले आहेत. दुसरी घटना फोंडा (Ponda) येथील असून मतदान करताना मतदान यंत्रासह मोबाईलच्या साह्याने फोटो घेताना गितेश नाईक याला पोलिसांनी अटक केली आहे.

अशाच प्रकारे पर्वरी (Porvorim) येथे मतदान यंत्रासह मोबाईलच्या आधारे फोटो घेताना संदीप मांद्रेकर याला पोलिसांनी अटक केली आहे. याशिवाय ओल्ड गोवा येथे मतदान करण्यापासून रोखण्याच्या कारणाने एका व्यक्तीच्या विरोधात केस नोंद झाली आहे. तर पाचवी घटना डिचोली येथील असून वल्लभ साळकर यांची गाडी अज्ञातांनी पेटवली आहे ही घटना काल रात्रीची आहे यासंदर्भात सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून या आधारे पोलीस अधिक तपास करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT