Goa Fishing  Dainik Gomantak
गोवा

Goa Fishing: मासेमारीसाठी लगबग सुरू; नवा हंगाम १ ऑगस्टपासून

Fisherman In Salcete: मच्छीमार जाळ्याची तपासणी व जुळवाजुळव करू लागले आहेत; परप्रांतीय मजूरसुद्धा गावांतून परतू लागले आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: ६१ दिवसांची मासेमारी बंदी ३१ जुलै रोजी संपत असून नवा हंगाम १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या नव्या मासेमारी हंगामाच्या स्वागतासाठी सासष्टी किनारपट्टीतील मच्छीमार तयारीला लागले आहेत. सध्या सतत पडत असलेल्या पावसामुळे समुद्र खवळलेला आहे व ही स्थिती मासेमारीसाठी योग्य नसल्याने मच्छीमार थोडे चिंतीत झालेले असले, तरीही त्यांनी तयारी सुरू केली आहे.

कोलवा, बाणावली येथील मच्छीमार आपल्या जाळ्याची तपासणी व जुळवाजुळव करू लागले आहेत. परप्रांतीय मजूरसुद्धा हळूहळू आपल्या गावांतून परतू लागले आहेत. कुटबण व बेतुल जेटीवरही मच्छीमारांची लगबग सुरू झाली आहे. परप्रांतीय मजूरही बोटींच्या सज्जतेसाठी जेटीवर दिसू लागले आहेत. देशाच्या विविध भागांतून अनेक मच्छीमार मजूर गोव्याकडे येण्यास निघाले आहेत.

बोटींची तपासणी सुरू

यासंदर्भात कोलवा येथील मच्छीमार दुमिंग रॉड्रिग्ज म्हणाले, की आम्ही आमच्या परीने तयारीला लागलो आहोत. आम्ही आमच्या बोटीची तपासणी सुरू केली आहे. एक दोन दिवसांत चाचणीसुद्धा करण्यात येईल.

‘उद्या घेणार आशीर्वाद’

बाणावली येथील मच्छीमार पेले फर्नांडिस म्हणाले, की आम्ही सर्व मच्छीमार देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी २५ जुलै रोजी बाणावली येथील क्रॉसजवळ जमणार आहोत. त्यानंतर पावसाच्या स्थितीचा अंदाज घेऊन मासेमारीसाठी समुद्रात जाण्याविषयी ठरविण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT