Fisherman Dainik Gomantak
गोवा

नुकसान दोन लाखांचे, भरपाई केवळ चाळीस हजार; सरकारच्या सतावणूकीवर मच्छिमार संघटनेने केलीय 'ही' मागणी

कॉर्पस निधी मच्छिमारांकडूनच घेता तर भरपाई देण्यास कोणती अडचण आहे?

गोमन्तक डिजिटल टीम

Fisherman मच्छिमार खात्याकडे कॉर्पस निधी असूनही आगीत तसेच वादळामुळे नुकसान झालेल्या होड्यांसाठी भरपाई देण्यात चालढकलपणा व सतावणूक केली जात आहे, असा आरोप अखिल गोवा लहान मच्छिमार संघटनेने केला आहे.

सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले असताना ही भरपाई ४० हजार रुपये देण्याचा निर्णय खात्याने घेतला आहे, तो मान्य नाही. खात्याने त्याऐवजी त्याच्या बदल्यात नवी होड्याच द्याव्यात, अशी मागणी संघटनेने केली.

मच्छिमार खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीवेळी मच्छिमारांच्या नुकसानभरपाईपोटी सुमारे २० कोटीचा कॉर्पस निधी जमा आहे, अशी माहिती देण्यात आली होती. त्यामुळे या निधीवरील व्याजातूनच मच्छिमारांच्या नुकसानीची भरपाई देणे शक्य आहे. मात्र, ती देण्यामागे मच्छिमारांची सतावणूक केली जात आहे, अशी तक्रार त्यांनी केली.

मच्छिमारांबाबत भेदभाव

काकरा येथे वादळात तसेच आगीमध्ये भस्मसात झालेल्या होड्यांसाठी त्वरित नुकसानभरपाई द्यावी तसेच जर त्यांना भरपाईचा निधी द्यायचा नसल्यास त्यांनी त्याच्या बदल्यात नव्या होड्या मोफत द्याव्यात अशी मागणी केली आहे.

तिसवाडी तालुक्यातील मच्छिमारांसाठी इंधन सबसिडी देण्यात आलेली नाही. त्यामुळे या तालुक्यातील मच्छिमारांबाबत खाते भेदभाव करत आहे, असा आरोप संघटनेचे सचिव लक्ष्मण मंगेशकर यांनी केला आहे.

संघटनेनेने उपस्थित केले प्रश्‍न

मच्छिमार होड्या मालकांकडून जमा केलेला कॉर्पस निधीतून ही भरपाई देण्यास खात्याकडून चालढकलणा सुरू आहे. इंधन सबसिडी 50 हजार रुपये होती ती आता 30 हजार करण्यात आली आहे. ती वाढवण्यासाठी अर्ज करा असे सांगितले जाते.

मात्र, कमी केले तेव्हा खात्याने संघटनेला विश्‍वासात का घेतले नाही? असा सवाल केला. नुकसान भरपाईसाठी आमदारांकडे लोटांगण घाला, असे खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते.

कॉर्पस निधी मच्छिमारांकडूनच जमा केला जातो. तर त्याच्यातूनच भरपाई देण्यास खात्याला कोणती अडचण आहे? असा प्रश्‍न संघटनेने केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: सभापती तवडकर- मंत्री गावडे यांच्यातील वाद टोकाला; राजीनामा देण्याचा तवडकरांचा भाजपला इशारा

Cash For Job Scam: प्रिया यादवला तीन दिवसांची पोलीस कोठडी; डिचोली न्यायालयाचा झटका!

Goa News Updates: '...तर मी सभापतीपदाचा राजीनामा देईन' तवडकरांचा सरकारला थेट इशारा; वाचा दिवसभरातील घडाामोडी

IFFI Goa 2024: यंदाचा इफ्फी सोहळा दणक्यात! मडगाव आणि फोंड्यात लागणार सहा एक्स्ट्रा स्क्रीन्स

Government Job Scam: सरकारी नोकरीचे 'मायाजाल'! वेतन, ऐषोरामाचे आकर्षण; 'रोखी'मुळे होणारा मनस्ताप

SCROLL FOR NEXT