मुख्यमंत्री सावंत गोंयकारपण सोडण्यास सांगत आहेत का?

सडेतोड नायक: फा. व्हिक्टर फेर्राव यांचा सवाल; गोव्याचे वेगळे अस्तित्त्व अबाधित राखावे
Discussion session
Discussion sessionDainik Gomantak

Portuguese sign पोर्तुगीज वास्तुकला, खाद्यसंस्कृती, संगीताची जी आपल्यात सांस्कृतिक देवाण-घेवाण झाली आहे, त्यातून गोव्याची एक वेगळी अस्मिता निर्माण झाली. गोवा पोर्तुगिजांपासून मुक्त होऊन 60 वर्षे झाली.

आम्ही गोंयकारपण स्वीकारले. पर्यायाने भारतीय झालो. आता मुख्यमंत्री आम्हाला गोंयकारपण सोडण्यास सांगत आहेत का? असा सवाल फा. व्हिक्टर फेर्राव यांनी उपस्थित केला.

गोमन्तक टीव्हीच्या ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमातील विशेष चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चेत संदीप हेबळे आणि विश्‍व हिंदु परिषदेचे मोहन आमशेकर यांनी सहभाग घेतला होता.

फा. फेर्राव म्हणाले, मुख्यमंत्री सावंत यांनी पोर्तुगीज खूणा नष्ट करून नवीन गोवा निर्माण करण्याचे जे विधान केले आहे, ते मला गांभिर्याचे वाटत नाही. पोर्तुगिजांनी गोव्याला राजकीय आणि सामाजिक नकाशा दिला, हे आपण नाकारू शकत नाही.

Discussion session
बेतूलचे दीपगृह

चर्चने माफी मागावी: आमशेकर

विश्‍व हिंदू परिषदेचे कार्यवाहक मोहन आमशेकर यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना व्हॅटिकन व पोर्तुगाल देशाने गोमंतकीयांची माफी मागावी, अशी मागणी केली. ते म्हणाले, त्यांनी धर्म लादण्याचे अघोरी कृत्य चालविल्याने अनेक हिंदूंना परागंदा व्हावे लागले.

इंक्विझिशन लादल्यामुळे अनन्वित छळ झाला. व त्यातील अनेक जण मरण पावले आणि काहींना येथून पळ काढावा लागला. देशातील हिंदू सोशिक व आदरातिथ्य करणारा होता; त्याचा गैरफायदा घेऊन वसाहतवाद्यांनी येथे आपला धर्म व संस्कृती लादली आणि येथील भारतीय तत्वांची नासधूस केली आहे.

येथील अन्य धर्मियांनी मक्का व मदिनाशी निष्ठा राखण्याऐवजी या देशावर प्रेम करावे, असे आवाहन आमशेकर यांनी केले.

Discussion session
Gomantak Editorial: उद्याचा पाऊस..!

इतिसहासाला राजकीय रंग नको

इतिहास हा राजकारणाचा घटक नसून तो संशोधनाचा भाग आहे. सरकार जो इतिहास शालेय पाठ्यक्रमात देतो, तोच आम्ही वाचत असतो. परंतु तत्कालीन सामाजिक, राजकीय, परिस्थिती नेमकी काय होती?

आज जो इतिहास सांगतिला जातो तसाच तो नेमका होता का? यावर संशोधन होणे गरजेचे आहे. त्यामुळे इतिहासाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असे संदीप हेबळे यांनी सांगितले.

Discussion session
Portuguese Traces: खुणा पुसणे ही वसाहतवादाचीच नक्कल

आपली अस्मिता जपणे गरजेचे

पोर्तुगीजांनी काजू आणले. त्यापासून फेणी गोवेकरांनी तयार केली. मिरची, बटाटे आणले. त्याची आम्ही व्यंजने केली. त्यामुळे पोर्तुगीजहून आलेल्या घटकांपासून आम्ही आपली स्वतःची वेगळी नवनिर्मिती केली.

आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले. ते आम्ही सर्वांनी जपणे गरजेचे आहे. आता संपूर्ण जगात विचारांची, संस्कृतीची देवाण-घेवाण सुरू आहे. त्यामुळे आम्ही आपली अस्मिता गोंयकारपण जपणे गरजेचे असल्याचे फा. व्हिक्टर फेर्राव यांनी सांगितले.

सक्तीने धर्मांतरण, हिंदुंवर अत्याचार

पोर्तुगिजांनी धर्मांतरण सक्तीने केले. इंक्विझिशन लादले. हिंदुंवर अत्याचार या कालखंडात झाले. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे त्यावर काही प्रमाणात आळा बसला. गोमंतकीय जनता १ हजार वर्षे पारतंत्र्यात भरडली गेली.

आपल्या वेशभूषा व इतर सांस्कृतिक बाबींवर याचा परिणाम झाला आहे. हातकातरो खांब, कुंकळ्ळीचे बंड याचे साक्षीदार आहेत. सर्वसामान्य जनतेने घाबरून धर्मांतरण केल्याचे मोहन आमशेकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com