Cutbona Jetty Dainik Gomantak
गोवा

Cutbona Jetty: 'माशे मेंळ्ळे ना'! समुद्र अजून खवळलेला, कुटबण जेटीवर मजूर परतले; ट्रॉलरमालकांची वाढली लगबग

Cutbona jetty fishing: ट्रॉलरची देखभाल व दुरुस्ती सुरू झाली आहे. तरी सध्या समुद्र खवळलेला आहे, त्यामुळे मासेमारी मोसमाची सुरवात लांबण्याची शक्यता मच्छिमार व्यक्त करताना दिसत आहेत.

Sameer Panditrao

सासष्टी: यंदाचा मासेमारी मोसम सुरू व्हायला दोन दिवस बाकी असताना कुटबण जेटीवर ट्रॉलर मालकांची लगबग सुरू झाली आहे. आपल्या गावी गेलेले मजूर परतायला सुरवात झाली आहे.

ट्रॉलरची देखभाल व दुरुस्ती सुरू झाली आहे. तरी सध्या समुद्र खवळलेला आहे, त्यामुळे मासेमारी मोसमाची सुरवात लांबण्याची शक्यता मच्छिमार व्यक्त करताना दिसत आहेत. जे काही पारंपरिक मच्छिमार समुद्रात गेले होते त्यांच्या जाळ्याला भरपूर मासळी लागली ते पाहून यंदा भरपूर मासळी मिळण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.

कुटबण जेटीवरील ट्रॉलर मालकांनी आपले ट्रॉलर अजून हलवलेले नाहीत. काही ट्रॉलर मालकांचे मजूर अजून परतलेले नाहीत. शिवाय केळशी किनाऱ्यावर वाळूचे ढीग दिसत आहेत, त्यामुळे बोटी हलविण्यास त्रास होत आहे.

ओडिशा, आंध्र प्रदेश व कर्नाटकातून काही मजूर परतलेले आहेत व त्यांनी जाळी व्यवस्थित करण्याचे काम हातात घेतले आहे. काही दिवसांपासून समुद्र खवळलेला व सध्या पाऊस पडत असल्याने व वारा वाहत असल्याने ही परिस्थिती नेमकी आणखी किती दिवस राहील हे सांगता येत नाही, असे मच्छिमारांचे म्हणणे आहे. या परिस्थितीत आम्ही धोका पत्करायला तयार नाही, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Akbar Hajj History: बैराम खान सहस्रलिंग सरोवरावर पोचला, बंडखोर अफगाणांनी हल्ला केला; बादशाह अकबर व हज यात्रेकरू

Priya Marathe Death: "माझी बहीण लढवय्या होती पण त्या कॅन्सरने..." प्रियाच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावनिक पोस्ट

Goan Nevri: मोदकांइतक्याच महत्वाच्या 'नेवऱ्या'! गोमंतकीय खाद्यपदार्थांचे वेगळेपण

Shai Hope Video: ‘असाही कोणी आउट होतो?’; शे होपची विचित्र विकेट पाहून चाहते हैराण, सोशल मीडियावर व्हिडीओ तूफान व्हायरल

Horoscope: राधाष्टमी आणि लक्ष्मी व्रताचा शुभ योग; 'या' 5 राशींसाठी रविवार ठरणार 'लकी'

SCROLL FOR NEXT