Viriato Fernandes Dainik Gomantak
गोवा

Goa Fishermen Problems: 'विकासाच्या नावाखाली समुद्र किनाऱ्यांचे नुकसान'! गोव्यातील मच्छिमारांचा प्रश्न संसदेत मांडणार; फर्नांडिस

Viriato Fernandes: आपण केवळ पत्र पाठविल्याचे वर्तमान पत्रातून वाचले आहे. या संदर्भात आपण कुणाशीही संपर्क साधलेला नाही. हा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे व तो मिटवला जाईल, असेही फर्नांडिस यांनी स्पष्ट केले.

Sameer Panditrao

सासष्टी: गोव्यात १०५ किमी समुद्र किनारा आहे व या किनाऱ्यावर कित्येक मच्छिमार पिढ्यान् पिढ्या मासळीचा व्यवसाय करून आपली उपजीविका चालवत आहेत. मात्र, काही लोक आता विकासाच्या नावाखाली समुद्र किनाऱ्याची वाट लावत असून त्याचा फटका पारंपरिक मच्छिमारांना बसत आहे.

याची जाणीव आपल्याला आहे. आपण पारंपरिक मच्छिमारांचे प्रश्न संसदेत मांडणार आहे, असे आश्र्वासन दक्षिण गोव्याचे खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी आज वेळ्ळी, चिंचोणे, असोळणा येथील मच्छिमारांची भेट घेतली तेव्हा सांगितले.

या मच्छिमारांनी आपल्या अनेक समस्या खासदारांसमोर मांडल्या. मच्छिमारांनी त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मागे राहू नये. जर आपल्याला या विषयावर संसदेत बोलण्याची संधी मिळाली नाही तर आपण संबंधित खात्याच्या मंत्रालयाला पत्र लिहून मच्छिमारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

पाटकरांच्या पत्राबद्दल माहीत नाही, विरियातो

गोव्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी हळदोण्याचे आमदार कार्लुस फेरेरा यांच्या विरोधात पत्र लिहिले आहे, याची आपल्याला काहीही माहिती नाही, असे कॉंग्रेसचे दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी आज पत्रकारांना सांगितले.

आपण केवळ पत्र पाठविल्याचे वर्तमान पत्रातून वाचले आहे. या संदर्भात आपण कुणाशीही संपर्क साधलेला नाही. हा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे व तो मिटवला जाईल, असेही फर्नांडिस यांनी स्पष्ट केले. सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात त्याचा काहीही परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indonesia Ship Fire: इंडोनेशियात जहाजाला भीषण आग, प्रवाशांनी समुद्रात घेतल्या उड्या; थरारक VIDEO व्हायरल!

Virat Kohli 5 Morning Habits: तुम्हीही व्हा विराटसारखे 'सुपरफिट'! कोहलीच्या फिटनेसचे रहस्य उघड, त्याची सकाळची 'ही' खास सवय माहितीय का?

Health Tips: वारंवार जुलाब लागणं असू शकतं 'या' गंभीर आजाराचं लक्षण! इन्फेक्शन समजून दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

हातात AK47 घेऊन फोटो! सक्तीने 'धर्मांतरण' करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; गोव्यातील महिलेसह 10 जणांना अटक

सांगेत 14 वर्षांपासून जीवघेण्या लाकडी पुलावर धोकादायक प्रवास; आदिवासी बांधवांची व्यथा दुर्लक्षित!

SCROLL FOR NEXT