South Goa solar prawns Dainik Gomantak
गोवा

दक्षिण गोव्यात मच्छीमारांना मिळाला सोलर कोळंबीचा बंपर कॅच

दक्षिण गोव्यातील मासेमाऱ्यांना मिळाला सुंगटे माशांचा मोठा खजाना

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: सासष्टी तालुक्यातील समुद्र किनारी मच्छीमारांना मोठ्या प्रमाणात सोलर कोळंबी सापडली आहे. सासष्टी येथील लहान बोटीवाल्यांनी आपल्या मच्छीमारांच्या हंगामाला तीन दिवसापूर्वी सुरुवात केली आहे. गेले दोन महिने मासेमारी बंद आहे. मासेमारी बंद असली तरी मात्र साष्टीत पारंपारिक पद्धतीने गेले तीन दिवस ती सुरु केली आहे. त्याचा फायदा मच्छीमारांना झाला आहे.

राज्यातील मासेमारी 1 ऑगस्टला सुरु होणार

राज्यातील मासेमारी बंदी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशी उठणार आहे. असे असले तरी लहान मच्छीमारांनी दर्या शांत असल्याने तीन दिवसांपूर्वी आपल्या बोटी घेऊन समुद्रात उतरायला सुरुवात केली आहे. मागील दोन दिवसांपासून येथील मच्छीमाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कोळंबी मासळी सापडली आहे. त्यामुळे मच्छीमार खुश झाले आहेत.

Solar prawns

या बंपर धमाक्यात कासावली, कोलवा, बाणावली, वार्का येथील व्यवसायिकांचा समावेश आहे. या विषयावर बोलताना कासावली येथील मासळी मारी करणारे जॅकी फेर्नांडीस यांनी सांगितले की, येथील मच्छीमारांनी आपल्या बोटी समुद्रात उतरविल्या आहेत.यापैकीच काहींना मोठ्या प्रमाणात कोळंबी सापडली आहेत. बाणावली सहित येथील काही मच्छीमारांना अशाच प्रमाणे कोळंबी प्रकारची मासळी सापडली आहे. त्यांना दर ही चांगला मिळाल्यास आपल्याला अजून आनंद होईल असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT