Traditional Fishing  Dainik Gomantak
गोवा

Traditional Fishing : पारंपरिक मासेमारीसाठी बाणावलीत मच्छीमार सज्ज

Goa Fishermen : सर्व मच्छीमारांचे रक्षण करावे, भरपूर मासळी त्यांच्या जाळ्यात पडावी व सर्व गोमंतकीय मासळी खाऊन संतुष्ट व्हावेत. तसेच मच्छीमारांसह सर्वांनाच चांगले आयुष्य, आरोग्य व यश प्राप्त व्हावे, अशी देवाकडे प्रार्थना केल्याचे धर्मगुरूंनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी, मच्छीमारी हंगाम १ ऑगस्टपासून सुरू होत आहे. आज बाणावलीत मच्छीमारांनी समुद्रकिनारी ख्रिस्ती धर्मगुरूंच्या उपस्थितीत बोटी, जाळी, इतर साधने व समुद्राची पूजा करून देवाचे आशीर्वाद घेतले.

सर्व मच्छीमारांचे रक्षण करावे, भरपूर मासळी त्यांच्या जाळ्यात पडावी व सर्व गोमंतकीय मासळी खाऊन संतुष्ट व्हावेत. तसेच मच्छीमारांसह सर्वांनाच चांगले आयुष्य, आरोग्य व यश प्राप्त व्हावे, अशी देवाकडे प्रार्थना केल्याचे धर्मगुरूंनी सांगितले.

मच्छीमार पेले फर्नांडिस यांनी सांगितले की आम्ही पारंपरिक मच्छीमार दरवर्षी समुद्रात मासळी गोळा करण्यापूर्वी देवाचे आशीर्वाद घेतो. त्याप्रमाणे आज आम्ही देवाचे आशीर्वाद घेतले. नवा हंगाम आम्हा सर्वांना यशदायी ठरो, अशी आम्ही प्रार्थना केली. त्यानंतर जाळी बोटीला बांधून बोट समुद्रात सोडण्यात आली. आज केवळ सुरवात म्हणून थोडी मासळी गोळा केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Crime: APK File डाउनलोड करणं पडलं महागात! आके येथील महिलेच्या बँक खात्यातून 6.5 लाख उकळले, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Crime News: आई आणि लहान भावाचा 17 वर्षीय अर्जुननं काढला काटा, चॅटजीपीटीला विचारायचा ठार मारण्याचा प्लॅन; अखेर 'सायको किलर' पोलिसांच्या ताब्यात VIDEO

Bison In Goa: नार्वेत गव्यांचा धुमाकूळ! भाजी पिकाची नासधूस, बंदोबस्‍ताची मागणी; ऐन पिकाच्या हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक फटका

Google Pixel 11 Series भारतात लॉन्च! 5x झूम, Magic Capture अन् Gemini AIसह मिळणार भन्नाट फीचर्स; किंमत किती? जाणून घ्या

Surya Gochar 2026: 31 ऑगस्टला सूर्याचा ‘पूर्वाफाल्गुनी’ नक्षत्रात महाधमाका! 'या' 5 राशींची चांदीच चांदी; मिळणार राजासारखे वैभव

SCROLL FOR NEXT