fish market Dainik Gomantak
गोवा

'मांद्रे मार्केटमध्येच मासळी विक्री करावी'

आमदार जीत आरोलकर: नियम न पाळल्यास कारवाई करण्याचा इशारा

दैनिक गोमन्तक

मोरजी: मांद्रे पंचायत क्षेत्रात मासळी मार्केट असूनही काही मासे विक्रेत्या रस्त्यावर अर्थात मासळी मार्केटच्या बाहेर बसत आहेत. यामुळे भविष्यात दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने सर्व मासे विक्रेत्यांनी मासळी मार्केटमध्ये बसूनच मासे विक्री करावी, अशी सूचना मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी केली. त्यांनी मासळी मार्केटला भेट देऊन मासे विक्रेत्यांची समस्या जाणून घेतली आणि त्यांना मार्केटमध्ये बसून मासे विक्री करा, असे सुचवले.

यावेळी मांद्रे सरपंच प्रिया कोनाडकर, माजी सरपंच सुभाष आसोलकर, पंच दुमिंग फर्नांडिस, गुणाजी ठाकूर, प्रवीण वायंगणकर, माजी सरपंच राघोबा गावडे, सूरज नाईक उपस्थित होते. काही दिवस मासे विक्रेते आत बसतात आणि नंतर ये रे माझ्या मागल्याप्रमाणे करत असतात.

आता आमदार आरोलकर यांनी या विक्रेत्यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन सर्व विक्रेत्यांनी मार्केटमध्ये बसूनच मासे विक्री करावी अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सरपंच प्रिया कोंनाडळकर यांनी दिला. आरोलकर म्हणाले, मांद्रे गावात पंचायतीने चांगले मार्केट उभारले आहे. त्या मार्केटमध्ये काही मासे विक्रेत्या बाहेर बसून मासे विक्री करतात. त्यांनी आत बसून विक्री करावी.

बाहेर बसल्याने आणि जवळच प्रमुख रस्ता असल्याने या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रहदारी असते. भविष्यात अपघात घडण्याची भीती व्यक्त करून मासे विक्रेत्यांनी पंचायतीला सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Smriti Mandhana: 'तिला' स्विमिंगसाठी विचारलं! पलाश मुच्छलचे भलत्याच मुलीसोबत चॅट्स व्हायरल; क्रिकेटर स्मृतीला मोठा धक्का?

Uttar Pradesh Crime: माणुसकीला काळिमा! 'घरात लग्न आहे, अपशकुन होईल...' आईचा मृतदेह घेण्यास मुलाचा नकार, वृद्ध बाप ढसाढसा रडला; अंत्यसंस्कारही झाले नाही

Goa ZP Election: मनोज परब आणि सरदेसाईंना हव्या असणाऱ्या जागा वगळता काँग्रेसची यादी फायनल, लवकरच होणार जाहीर; पाटकरांनी स्पष्टच सांगितलं

Goa Politics: "दाल में कुछ काला है!", सरदेसाईंचा भाजपवर हल्ला; विरोधी पक्षांना दिला '30-10-10'चा फॉर्म्युला

Goa Live News: झेडपी निवडणुकीच्या तयारीसाठी 'आप'ने जाहीर केले नवे पदाधिकारी

SCROLL FOR NEXT