Vasco Bus Stand Fish Selling Dainik Gomantak
गोवा

Vasco Bus Stand Fish Selling: वास्को बसस्थानकावर मासेविक्रीचा त्रास; दुर्गंधीने प्रवासी हैराण, कारवाईची मागणी

Vasco Bus Stand Hygiene: वास्को येथील जुन्या बसस्थानकावर सकाळच्या वेळी काही मासेविक्रेत्या महिला माशांच्या टोपल्या ठेवूव विक्री केली जाते.

गोमंतक ऑनलाईन टीम

वास्को: येथील जुन्या बसस्थानकावर सकाळच्या वेळी काही मासेविक्रेत्या महिला माशांच्या टोपल्या ठेवूव विक्री केली जाते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असून, संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

जुन्या बसस्थानकावरील शेडची मोडतोड झाली होती, तसेच पदपथावरील सिमेंट उखडल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. याची दखल घेत शिपयार्डने सामाजिक उत्तरदायित्व निधीअंतर्गत बसस्थानकाच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानुसार बसस्थानकाचा कायापालट करण्यात आला. जुने शेड हटवून नवीन शेड उभारण्यात आले. तसेच नवीन फरश्या बसवून प्रवाशांना बसण्यासाठी आसनांची व्यवस्था करण्यात आली.

स्वच्छता राखावी

मासळीच्या टोपल्यांमुळे पसरणाऱ्या दुर्गंधीने पुन्हा गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी आणि बसस्थानकाची स्वच्छता राखावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Budh Gochar 2026: ग्रहांच्या राजकुमाराची बदलली चाल! बुधाच्या कृपेने धनलाभाचा योग; 3 नोव्हेंबरपासून सुरु होणार 'या' 5 राशींचा गोल्डन पिरियड

RBI Plastic Currency: 'आत्मनिर्भर भारता'चे आणखी एक पाऊल! केंद्र सरकारकडून 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटांच्या छपाईला मंजुरी

Indian Football League: शेवटच्या मिनिटाला एफसी गोवाचा गोल! स्पोर्टिंग क्लब दिल्लीविरुद्ध थरारक 1-1 बरोबरी

E-Sakal: 'ई-सकाळ'चे निर्विवाद वर्चस्व! 55 मिलियन वाचकांसह पुन्हा ठरले नंबर 1

Ranji Trophy: रणजी करंडकात गोव्यावर पराभवाचे संकट; विदर्भाची 222 धावांची आघाडी, डावाने पराभव टाळण्याचे आव्हान

SCROLL FOR NEXT