Pollution  Dainik Gomantak
गोवा

Goa Pollution: मासळीच्या असह्य दुर्गंधीमुळे जनता त्रस्त

Cuncolim Pollution: प्रक्रिया प्रकल्पातील दुर्गंधीपासून कधी होणार सुटका कुंकळ्ळीवासीयांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

दैनि्क गोमन्तक वृत्तसेवा

Cuncolim Pollution: कुंकळळी औद्योगिक वसाहतीतील मासळी प्रक्रिया प्रकल्पातून तयार होणाऱ्या असह्य दुर्गंधीचा सुमारे एक दशकाहून अधिक काळ कुंकळ्ळीकरांना सामना करावा लागत आहे. माशांची असह्य दुर्गंधी केवळ औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्यांसाठीच नाही, तर सर्वसामान्यांसाठीही धोकादायक बनली आहे. अनेक तक्रारी आणि तपासणीनंतरही माशांच्या असह्य वासापासून कुंकळ्ळीकरांची सुटका झालेली नाही.

असह्य दुर्गंधीने जनता त्रस्त झाली असून प्रदूषण नियंत्रण मंडळ, स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरपालिका मंडळ, औद्योगिक विकास महामंडळ व सरकार हे सगळे बेकायदेशीर प्रकार खपवून घेत असल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी त्वरित तोडगा काढून कुंकळ्ळीवासीयांना दुर्गंधीमुक्त करावे, अशी मागणी कुंकळ्ळीवासी करीत आहेत.

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत दहा मासळी प्रक्रिया प्रकल्प आहेत. यापैकी बऱ्‍याच कारखान्यांमध्ये सांडपाणी प्रक्रिया करण्याची यंत्रणाच नाही. काही कारखान्यांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नावापुरता आहे. बंद असलेली सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा केवळ प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (Pollution Control Board) अधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान किंवा संयुक्त तपासणीदरम्यानच चालतात.

मासळी प्रक्रिया प्रकल्पात निर्माण होणारे दूषित सांडपाणी उघड्या गटारातून औद्योगिक वसाहतीजवळील असलेल्या तलावात प्रक्रिया न करताच सोडले जाते. दूषित सांडपाणी उघड्यावर सोडल्याने संपूर्ण औद्योगिक वसाहतीत दुर्गंधी पसरलेली आहे. असे गैर प्रकार वारंवार घडत असून या पूर्वी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने अशाप्रकारे दुर्गंधी फैलावणाऱ्या कारखानदारांवर सक्त कारवाई करताना कारणे दाखवा नोटीस बजावून मोठा दंडही ठोठावला होता.

मात्र, आता पुन्हा तसेच प्रकार होताना दिसत आहेत. कुंकळ्ळी (Cuncolim) औद्योगिक वसाहतीजवळ एक मोठा नैसर्गिक तलाव आहे, जेथे काही मासळी प्रक्रिया प्रकल्प योग्यप्रकारे प्रक्रिया न केलेले सांडपाणी तलावात सोडत असल्याने तलावाला विकृत रूप आलेले पाहायला मिळते. काही मत्स्य वनस्पती उघड्यावर प्रक्रिया न केलेले सांडपाणी उघड्या गटारांमध्ये टाकत आहेत. परिणामी संपूर्ण औद्योगिक वसाहतच दुर्गंधीग्रस्त झालेली आहे.

काही स्थानिक कारखानदारांनी यासंदर्भात औद्योगिक वसाहतीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली. मात्र, या गैरकारभारावर कृती करण्याचे धाडस अधिकारी व सरकार दाखवीत नाही. अधिकाऱ्‍यांशी यासंदर्भात संपर्क साधला असता ते हात वर करतात. प्रदूषणाची काळजी घेणे हे त्यांचे कर्तव्य नाही, तर या प्रकरणाकडे लक्ष देणे हे गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कर्तव्य आहे असा दावा स्थानिक आयडीसीचे अधिकारी करतात.

* कारखानदारांकडून नियमांची पायमल्ली होतेय

1. या प्रदूषणाची सखोल माहिती घेण्याचा प्रयत्न या प्रतिनिधीने केला असता बऱ्याच धक्कादायक बाबी बाहेर आल्या. काही महिन्यांपूर्वी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही प्रदूषण करणाऱ्या मत्स्य प्रक्रिया प्रकल्पांना दंड ठोठावला होता व कारणे दाखवा नोटीसही बजावली होती.

2. प्रदूषण नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. दुर्दैवाने दंडीत कारखानदारांनी सर्व नियमांची पायमल्ली करून व कोणाचीच पर्वा न करता तेच प्रकार पुन्हा चालू ठेवले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दणका! वेर्णात वृक्षतोडीला स्थगिती, उच्च न्यायालयाचा निर्णय; तज्ज्ञ समितीकडून पाहणी

Karapur Mega Project Protest: आंदोलकांना पणजीत रोखले; गुन्हे न नोंदविताच सोडले, मेगा प्रकल्पाविरोधात कारापूरवासी एकवटले

Monsoon Update: पावसाचा दिलासा 22 जूननंतरच; राज्य हवामान विभागाचा अंदाज; आता पाणी जपूनच वापरा! धरणांतील पाणी आटल्‍यानं जलस्रोत खात्‍याला चिंता

Horoscope: शुक्रवारचा दिवस ठरणार लाभदायक! 4 राशींना मिळणार यशाची नवी दिशा; कुटुंब, करिअर आणि आर्थिक क्षेत्रात सकारात्मक बदलांचे संकेत

Goa Drugs Case: काणकोणमध्ये अंमली पदार्थांवर कारवाई; 26.9 ग्रॅम चरससह हॉटेलच्या वेटरला अटक

SCROLL FOR NEXT