"... म्हणून मी मांसाहार सोडला", आरोग्यमंत्री विश्वजित राणेंचा भावनिक खुलासा; Watch Video

goa minister vegetarian: आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील एक अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचा निर्णय उघड केला
goa health minister lifestyle
goa health minister lifestyleDainik Gomantak
Published on
Updated on

vishwajit rane turns vegetarian: गोवा राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील एक अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचा निर्णय उघड केला आहे. त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून मांसाहार पूर्णपणे सोडून शाकाहार स्वीकारल्याचे सांगितले. यामागील कारण केवळ आरोग्य नाही, तर आईवरील प्रेम आणि अध्यात्मिक निष्ठा आहे.

डॉक्टर म्हणाले 'काळ कमी', मंत्री धावले मंदिराकडे

आरोग्यमंत्री असले तरी, विश्वजित राणे यांच्या आई दीर्घकाळ कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. डॉक्टरांनी जेव्हा राणेंच्या आईजवळ केवळ काही महिन्यांचाच काळ बाकी असल्याचे सांगितले, तेव्हा राणेंचा थरकाप उडाला.

या प्रश्नाचे उत्तर आणि आधार शोधण्यासाठी मंत्री विश्वजित राणे थेट देवाच्या मंदिरात पोहोचले. याच भावनिक क्षणी त्यांनी आईच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना म्हणून मांसाहार पूर्णपणे त्यागण्याचा निर्णय घेतला असे त्यांनी कडक न्यूज या वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सांगितले.

फेवरेट 'मास-करी'ऐवजी पनीर आणि सरसो

मांसाहार सोडल्यामुळे राणेंच्या आहारात मोठे बदल झाले आहेत. मुलाखतीत त्यांनी सांगितले की, त्यांनी त्यांचे पूर्वीचे आवडते पदार्थ जसे की गोवन फिश करी आणि लाल मास यांना आता पूर्णपणे बदलले आहे.

goa health minister lifestyle
Vishwajeet Rane: 16 महिन्यांत कॅन्सर इस्‍पितळ; आरोग्यमंत्री विश्वजीत राणे

आता त्यांच्या आहारात पनीर आणि सरसो का साग यांसारख्या शाकाहारी पदार्थांचा समावेश आहे. राणे यांनी स्पष्ट केले की, त्यांनी हे सर्व केवळ आईसाठी केले आहे. "मी मंत्री आहे, माझ्याजवळ काय आहे याची मला चिंता नाही. मला पक्षानं जे काही दिलं त्यातच मी खुश आहे," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com