Goa BJP: भाजपची लोकसभेसाठी तयारी सुरु!

Goa BJP: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण गोवा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे
South Goa BJP Office
South Goa BJP OfficeDainik Gomantak
Published on
Updated on

Salcete: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण गोवा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. या अनुषंगाने आज संध्याकाळी राणे यांनी मडगावच्या दक्षिण गोवा भाजप कार्यलयात पक्षाशी संबंधितांशी बैठक घेतली व विविध विषयांवर चर्चा केली.

या बैठकीला प्रदेशाध्‍यक्ष सदानंद शेट तानावडे, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, सभापती रमेश तवडकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, आमदार गणेश गावकर, उल्हास तुयेकर, दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष तुळशीदास नाईक, सचिव सर्वानंद भगत व इतर मान्‍यवर उपस्थित होते.

या बैठकीत उमेदवाराबाबत चाचपणीची प्राथमिक चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवाय मंत्री राणे यांनी दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाची माहिती जाणून घेतली. या लोकसभा मतदारसंघात समावेश असलेल्या विधानसभा मतदारसंघांतील परिस्थितीची माहितीही त्‍यांनी घेऊन आढावा घेतला.

South Goa BJP Office
कुंडईतील चोरी प्रकरणी तिघांना अटक

केंद्रीय मंत्री नारायण राणे आज सावर्डेत-

सावर्डे मतदारसंघातील कळसई येथील श्री सातेरी पिसान्नी सभागृहात उद्या शनिवारी सकाळी 10.30 वाजता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, आमदार डॉ. गणेश गावकर, सावर्डे जिल्हा पंचायत सदस्य सुवर्णा तेंडुलकर, धारबांदोडा जिल्हा पंचायत सदस्य सुधा गोविंद गावकर तसेच सातही पचायतींचे सरपंच व पंचसदस्य उपस्थित राहणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com