ट्रेनमध्ये भारतीय जवानाचा खून; चादरच्या वादातून साबरमती एक्सप्रेसमध्ये घडली घटना

Indian soldier murdered on Sabarmati Express: चाकू हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणावर झालेल्या रक्तस्त्रावानंतर भारतीय जवानाचा मृत्यू झाला आहे.
Sabarmati Express murder case
Indian soldier murdered on trainDainik Gomantak
Published on
Updated on

राजस्थान: भारतीय सैन्य दलातील जवानाचा चाकूने खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बिकानेर जम्मू तवी साबरमती एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली. चादरच्या वादातून एसी कोचमध्ये ही घटना घडली आहे. जवान ट्रेनमधून मूळ गावी जात असताना हा प्रकार घडला. बिकानेर पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.

जिग्नेश चौधरी असे खून झालेल्या जवानाचे नाव आहे. चौधरी जम्मू काश्मिर येथील उधमपूरमध्ये तैनात होते. तर, जुबैर मेमन असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

चौधरी यांनी अटेंडंटकडे बेडशीट मागितली होती. यावरुन दोघांमध्ये वाद झाला या वादातच अटेंडंट जुबैर याने चौधरी यांच्यावर चाकूने वार केला.

Sabarmati Express murder case
Goa Politics: मंत्रीपद देतो म्हटलं की धावत येतील, विरोधकांच्या एकीचा उपयोग होणार नाही, 2027 मध्ये गोव्यात भाजपचीच सत्ता; विश्वजीत राणे

चाकू हल्ल्यात जवान जिग्नेश चौधरी गंभीर जखमी झाले. व खूप रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. चौधरी फिरोजपूर छावणी येथून ट्रेनमध्ये बसले होते. साबरमती, गुजरात येथील रहिवासी असणारे चौधरी मूळ गावी निघाले असताना ही धक्कादायक घटना घडली. अटेंडंट जुबैरने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

Sabarmati Express murder case
"... म्हणून मी मांसाहार सोडला", आरोग्यमंत्री विश्वजित राणेंचा भावनिक खुलासा; Watch Video

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच बिकानेर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयित आरोपी जुबैर मेमन याला अटक केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे ट्रेनमध्ये एकच खळबळ उडाली, प्रवासी देखील चांगलेच घाबरले होते. पोलिसांनी संशयिताला अटक केली असून, याप्रकरणी अधिकचा तपास केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com