Goa Politics| आपली बदनामी करणाऱ्यांना कवळेकरांची फूस; सुभाष फळदेसाई यांचा आरोप

विरोधकांना कवळेकर करतात पैशांची मदत
Subhash Faldesai
Subhash FaldesaiDainik Gomantak
Published on
Updated on

केपे: सांगे येथील दांडो ते बाजारपर्यंतच्या रस्त्याची अवस्था बिकट झाली असून त्यासाठी मी निवडून येताच त्याचे डांबरीकरण करण्यासाठी लगेच सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून निविदासुद्धा काढली, पण लगेच पावसाळा सुरू झाल्याने हे काम सुरू करता आले नाही , असे सांगे येथे पत्रकार परिषदेत आमदार सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.

(Kavalekar's deception to those who defame him Allegation of Subhash Phaldesai in goa)

Subhash Faldesai
Goa Agriculture| नैसर्गिक शेती उपक्रम लवकरच सुरू करणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

रस्ता डांबरीकरणाच्या कामावरून आपली नाहक बदनामी करण्याचे षडयंत्र आपले विरोधक करीत असून त्यांना केपेचे माजी आमदार बाबू कवळेकर यांचे सहकार्य मिळत असल्याचा आरोप सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांनी केला आहे.

मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार असलेल्या फळदेसाई यांच्या विरोधात भाजप सरकारात उपमुख्यमंत्री असलेले कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर या बंडखोर उमेदवार म्हणून उभ्या होत्या. तेव्हा फळदेसाई यांनी कवळेकर यांनी आपल्या विरोधात काम केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा हा जाहीर आरोप केला आहे.

जनतेच्या सहकार्यानेच सांगेचा विकास

खालच्या पातळीवर जाऊन आपल्यावर आरोप करतात म्हणून आपणास ही पत्रकार परिषद घेण्यास विरोधकांनी भाग पाडले आहे. सांगेतील सुजाण जनतेने आपल्याला निवडून दिले असून त्यांना काय हवे व काय नको ते आपल्याला सांगतील व त्यांच्याच सहकार्याने सांगेचा सर्वांगीण विकास केला जाईल, असे फळदेसाई यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com