डिचोली: श्रावण महिन्यापासून चतुर्थीपर्यंत जवळपास दीड महिना ‘शिवराक’ राहिलेल्या मत्स्यखवय्यांची पावले आता पुन्हा मासळी मार्केटच्या दिशेने वळू लागली आहेत. पाच, सात आणि नऊ दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर डिचोलीच्या मासळी मार्केटात पूर्वीसारखी गजबज दिसू लागली आहे. बुधवारी मासळी खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती.
मार्केटात विविध प्रकारची मासळी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती. मात्र, वाढलेले दर ऐकून अनेक ग्राहकांच्या कपाळावर आठ्या पडल्या. मासळी महाग असतानाही पूर्वीसारखी ताजी आणि टवटवीत मासळी मिळत नसल्याची प्रतिक्रिया मदन माशेलकर व पांडुरंग तेली यांनी व्यक्त केली.
बुधवारी बाजारात सुरमईचा दर ८०० ते ९०० रुपये किलो, तर वाटा ६०० रुपये होता. आकारानुसार कोळंबी ५०० ते ६०० रुपये किलो, मुड्डशे व पापलेट सुमारे ६०० रुपये किलो दराने विकले जात होते. मध्यम आकाराचे बांगडे २०० रुपयांना पाच नग, तर मोठ्या आकाराचे बांगडे २०० रुपयांना तीन नग या दराने विकले जात होते. अन्य मासळीचे दरही चढेच होते.
मडगावहून मासळीचा पुरवठा
डिचोलीच्या मासळी बाजारात मडगावहून मोठ्या प्रमाणात मासळीचा पुरवठा केला जातो. श्रावण महिन्यापासून चतुर्थीपर्यंत जवळपास दीड महिना ‘शिवराक’ पाळल्यानंतर मत्स्यखवय्यांनी पुन्हा मासळी खरेदीसाठी बाजाराची वाट धरली आहे. गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर बाजारातील ग्राहकांची वर्दळ वाढली असून, बुधवारी मासळी खरेदीसाठी ग्राहकांनी आवडीच्या मासळीची खरेदी केली
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.