Pond Fish Death Goa Dainik Gomantak
गोवा

Pond Fish Death Goa: गणपती विसर्जनानंतर कपिलेश्वरी-कवळेच्या तळीत मासे मृत; 'बॉम्बसदृश' फटाक्यांमुळे प्रदूषण झाल्याचा स्थानिकांचा दावा

Kapileshwari Kavale Pond Fish Death: कपिलेश्‍वरी - कवळे येथील तळीत मृत मासे आढळल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

फोंडा: कपिलेश्‍वरी - कवळे येथील तळीत मृत मासे आढळल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. गणपती विसर्जन करताना बॉम्बसदृश मोठा आवाज करणारे फटाके तळीच्या पाण्यावर फोडल्यामुळे मासे मृत होण्याचा प्रकार घडल्याची चर्चा परिसरात सुरू असून तसा दावाही करण्यात येत आहे.

असा प्रकार यापूर्वी कधीही घडला नसल्याच्या प्रतिक्रियाही यावेळी व्यक्त करण्यात आल्या. या फटाक्यांमधील घातक रसायनांचा प्रभाव माशांवर पडला असावा, असाही या चर्चेचा सूर होता. मात्र, पुढील धोका टाळण्यासाठी मंदिर व्यवस्थापनाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाला यासंबंधी कळविण्यात येणार असून पाण्याचीही तपासणी केली जाईल, अशी माहिती देण्यात आली.

यंदा गणपतींचे विसर्जन केल्यानंतर तळीतील मासे मृत होण्याचा प्रकार घडल्याने लोकांनी सखेद आश्‍चर्य व्यक्त केले आहे. काहींच्या मते, तळीत प्रदूषण झाले असल्याने हे मासे मृत झाले असावेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

Indian Super League: चेन्नईयीनचा विजय एफसी गोव्याने हिरावला; फातोर्ड्यात सामना 1-1 गोलबरोबरीत

Marathi Language: मराठीच्या नावाने गर्दी नको, गुणवत्तेची लाट हवी! भाषा टिकवण्यासाठी पाच धोरणात्मक बदलांची गरज

Wisdom of the Fourth Tree: तीन झाडांचा अहंकार मोडला, चौथं झाड मात्र आनंदात जगलं; आयुष्याचा मोठा धडा शिकवणारी गोष्ट!

Goa Politics: काँग्रेसच्या 'गोंय राखण' यात्रेचा भाजपच्या 'सेवा ज्योती'समोर निभाव लागणार?

SCROLL FOR NEXT