Mumbai Goa highway and railways were closed Dainik Gomantak
गोवा

मुंबई-गोवा महामार्ग-लोहमार्ग बंद पडतो तेव्हा...

मुंबई गोवा (Mumbai-Goa) दरम्यानची वाहतूक कधीच बंद पडलेली नव्हती. पहिल्यांदाच महामार्ग (Highway) आणि लोहमार्ग (Railway) बंद पडल्याची घटना घडली.

दैनिक गोमन्तक

पणजी: मुंबईकडे (Mumbai) जाणारा राष्ट्रीय महामार्ग (National Highway) 10 तास तर कोकण रेल्वेमार्ग (Konkan Railway) 6 तास बंद राहिल्याने गोव्याचा (Goa) मुंबईशी असणारा दळणवळणाचा संबंध शनिवारी दुपारपर्यंत तुटला होता. कोविड महामारीच्या काळात कोविड नसल्याचे प्रमाणपत्र घेऊन प्रवास करावा लागत असला तरी मुंबई गोवा दरम्यानची वाहतूक कधीच बंद पडलेली नव्हती. पहिल्यांदाच महामार्ग आणि लोहमार्ग बंद पडल्याची घटना घडली. (First time the Mumbai Goa highway and railways were closed)

कोकण रेल्वे मार्गावर उक्षी-भोके दरम्यान करबुडे बोगद्यात दरड कोसळल्यामुळे हजरत निजामुद्दिन-मडगाव राजधानी एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून घसरले. पायलटने प्रसंगावधान ठेवत इमर्जन्सी ब्रेक लावल्यामुळे मोठा अनर्थ टळला. यामध्ये 265 प्रवाशांपैकी एकालाही किरकोळ दुखापत झाली नाही. ही दुर्घटना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत करण्यात कोकण रेल्वे प्रशासनाला यश आले.

करबुडे बोगद्यामध्ये मोठा दगड मार्गावर आल्यामुळे गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसच्या इंजिनाचे चाक मार्गावरून खाली उतरले. त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. बोगद्यामध्ये एक किलोमीटर आत ही दुर्घटना घडली होती.

नवीन पुलाच्या कामामुळे ‘ब्रेक’

राष्ट्रीय महामार्गावर चिपळूणनजीक नवीन पुलाच्या कामासाठी शुक्रवारी रात्री 11 ते पहाटे 4 पर्यंत फक्त चार तास बंद करण्यात आला. चिपळूण वाशिष्ठी पूल तब्बल 10 तासांहून अधिक काळ बंद राहिला. परिणामी मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक ठप्प झाली. सकाळी 9 वाजता पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली. शुक्रवारी रात्री नवीन पुलाचे स्लॅब टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे रात्री 11 ते पहाटे 4 पर्यंत जुन्या पुलावरील वाहतूक बंद ठेवण्याचे जाहीर करण्यात आले होते. रात्री 11 वाजता वाहतूक बंद करण्यात आली. स्लॅब ओतण्याचे काम 4 वाजता पूर्ण होणार होते. मात्र, पाऊस आणि तांत्रिक अडचणीमुळे वेळेत हे काम होऊ शकले नाही. सकाळी 9 वाजेपर्यंत हे काम सुरू होते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT