Someya Kumari Dainik Gomantak
गोवा

Goa Someya Kumari: आधी IAS परिक्षेत यश, आता IFS मध्येही मिळवली रँक; गोव्याच्या सोमेया कुमारीचे दुहेरी यश!

एकाच वर्षात UPSC च्या दोन परीक्षांमध्ये मिळवली रँक

Akshay Nirmale

Goa Someya Kumari: गोव्यातील वेरोडा, कुंकळी येथील सोमेया कुमारी हीने एकाच वर्षात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आणखी एका परीक्षेत यश मिळवले आहे. मे महिन्यातच सोमेया हीने UPSC द्वारे घेतल्या गेलेल्या नागरी सेवा परीक्षेत (CSE) अखिल भारतीय रँकिंगमध्ये 502 वे स्थान मिळवले होते.

आता तिने भारतीय वन सेवा (IFoS) परीक्षेत अखिल भारतीय रँकमध्ये 72 वा क्रमांक मिळवला आहे.

नुकतेच सोमेया कुमारी हीने दक्षिण गोवा विभागाचे उप वनसंरक्षक प्रेम कुमार यांच्या निमंत्रणावरून सोमवारी येथील वनविभाग कार्यालयाला भेट दिली. सोमेया हीचा IAS आणि IFoS दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

सोमेया ही मूळची बिहारची आहे. तिचे वडील सैन्यात आहेत. 2005 मध्ये त्यांची गोव्यात बदली झाली होती. ते कनिष्ठ कमिशन्ड आर्मी ऑफिसर आहेत. सोमेयाने इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले आहे.

भारतीय वन सेवा (IFoS) ही केंद्र सरकारच्या तीन अखिल भारतीय सेवांपैकी एक आहे, इतर दोन सेवांमध्ये भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) आणि भारतीय पोलीस सेवा (IPS) यांचा समावेश आहे.

सोमेया 2020 मध्ये IFoS मुख्य परीक्षेसाठी पात्र झाली होती. परंतु परीक्षेला बसली नव्हती. तथापि जेव्हा ती पुन्हा एकदा 2022 मध्ये मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरली, तेव्हा तिने चान्स घेतला नाही. तिने फॉरेस्ट सर्व्हिस मेन परीक्षा दिली. 2022 च्या प्रयत्नात CSE 502 च्या अखिल भारतीय रँकिंगसह आणि IFoS 72 सह ती उत्तीर्ण झाली.

26 वर्षीय सोमेया कुमारी गोवन, बिहारी, पंजाबी आणि गुजराती अशा संमिश्र वातावरणात वाढली आहे. फोंडा येथील केंद्रीय विद्यालयातून तिने शिक्षणाला सुरूवात केली. कुंकळ्ळी येथून तिने दहावीचे शिक्षण पूर्ण केले.

लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीतून तिने अभियांत्रिकीची पदवी घेतली. तर, सुरत येथील NIT मधून तिने पर्यावरण विषयात एम.टेक. केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT