Disinfection of Bicholim Police Station
Disinfection of Bicholim Police Station 
गोवा

डिचोलीत पहिला पॉझिटिव्ह सापडला

Dainik Gomantak

डिचोली

संबंधित रुग्ण म्हावळिंगेतील एका कंपनीत चालक म्हणून काम करीत असल्याची माहिती मिळाली आहे, तर दोन दिवसांपूर्वी गोकुळवाडा-सर्वण येथे आढळून आलेल्या युवकाच्या पाच वर्षीय मुलाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. दुसऱ्या बाजूने साखळी शहरात आज आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. गावठण आणि रुद्रेश्वर कॉलनी-हरवळे येथे प्रत्येकी एक मिळून हे दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे साखळीत आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांचा आकडा ३४ वर पोचला आहे.
डिचोली शहरातील बोर्डे परिसरात आज कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. संबंधित रुणाच्या कुटुंबियांनाना मये रेसिडन्सीमध्ये क्‍वारंटाईन केल्याची माहिती मिळाली आहे. डिचोलीत पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने शहरात खळबळ आणि घबराटीचे वातावरण पसरले आहे. डिचोली शहराला लागून असलेल्या म्हावळिंगे-लाडफे येथेही एक नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. यामुळे त्या परिसरासह लाडफे गावातही धास्ती पसरली आहे.
दोन दिवसांपूर्वी गोकुळवाडा-सर्वण येथे आढळून आलेल्या कोरोनाबाधित युवकाचा मये रेसिडेन्सीमध्ये क्‍वारंटाईन केलेल्या पाच वर्षीय मुलाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे, तर कुटुंबातील अन्य सदस्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
साखळी शहरात आढळलेले ३४, साळमधील ४, गोकुळवाडा-सर्वण येथील दोन आणि डिचोली आणि म्हावळिंगे-लाडफे येथील प्रत्येकी एक मिळून डिचोली तालुक्‍यात आजपर्यंत आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४२ वर पोचली आहे.
दरम्यान, डिचोली पोलिस ठाण्यात आज निर्जंतुकीकरण करण्यात आले.

 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loksabha Election 2024 : दोन्‍ही जागा ‘इंडिया’च जिंकणार! विरियातो फर्नांडिस

Siolim News : देशाच्या अधोगतीस काँग्रेस जबाबदार : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Goa News : राज्यात ७० टक्क्यांहून अधिक मतदान अपेक्षित! सदानंद शेट तानावडे

Crime News : काणकोणात बारचालकाचा संशयास्पद मृत्यू; मृतदेहाजवळ गावठी बॉम्ब, काडतुसेही सापडल्याने तर्कवितर्क

Santhacruz Health Centre : सांताक्रुझ येथील शहरी आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा; रुग्णांना मारावे लागतात हेलपाटे

SCROLL FOR NEXT