Manohar International Airport
Manohar International Airport  Dainik Gomantak
गोवा

Manohar International Airport : प्रतिक्षा संपली! 5 जानेवारीला मनोहर विमानतळावर पहिलं लॅन्डींग

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात नव्याने उभारण्यात आलेल्या 'मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळा'चे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी पार पडले होते. मात्र प्रत्यक्षात विमानतळ कधी सुरु होते याचे सर्वांनाच वेध लागले होते. गोव्यात सध्या दाबोळीत विमानतळ सुरु आहे. 5 जानेवारी पासून विमानतळावरून प्रत्यक्ष उड्डण संचालनाला सुरूवात होणार आहे.

दरम्यान, मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर 5 जानेवारीला 11 विमाने उतरणार आहेत. यामध्ये पहिले विमान इंडिगो कंपनीचे 6E 6145 हैदराबादहून येणारे सकाळी 9 वाजता उतरणार आहे. अशी माहिती मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्त्याने दिली. देशांतर्गत विमानसेवा गुरुवारपासून सुरू होईल, तर आंतरराष्ट्रीय विमानसेवा लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे, असेही त्यांनी सांगितले.

अधिकाऱ्याने सांगितले की, पहिल्या दिवशी मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर किमान 11 विमानांचे लॅन्डींग अपेक्षित आहे. इंडिगो, गो फर्स्ट, विस्तारा आणि आकासा विमान कंपन्या तिकीट काउंटर स्थापन करण्याच्या प्रक्रियेत आहेत. आंतरराष्ट्रीय विमानसेवा लवकरच मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडून सुरू होण्याची अपेक्षा आहे आणि आम्ही योग्य वेळेत त्या बाबतची माहिती प्रसिध्द करू,” असे अधिकाऱ्याने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: भाजपचा प्रचाररथ 'सुसाट'; 3 तारखेला अमित शाह यांची गोव्यात धडाडणार तोफ

देशवासीयांना आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

‘’प्रमोद सावंत सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, त्यांच्या 1000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा’’; अलका लांबा यांचा हल्लाबोल

Ranbir Alia Video: रणबीरच्या मुंबई सिटीकडून गोव्याचा पराभव, आलियासोबत विजयी जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

SCROLL FOR NEXT