गोव्यात आतापर्यंत 300 गर्भवतींना पहिला डोस! Dainik Gomantak
गोवा

गोव्यात आतापर्यंत 300 गर्भवतींना पहिला डोस!

गोव्यात कोरोना आवाक्यात : तीन महिन्यांनंतर कोरोनाबाधितांची संख्या हजाराच्या आत

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात (Goa) कोरोनाबाधितांची (Covid-19) संख्या गेल्या तीन महिन्यांनंतर एक हजाराच्या आत (992) आली आहे. त्यामुळे कोरोनाचे संसर्गावर नियंत्रण ठेवण्यास सरकारला यश आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत असून ते 97.58 टक्क्यांवर पोहचले आहे, तर पॉझिटिव्हिटीचे प्रमाण 2.07 टक्के आहे. लसीकरणाबाबतही लोकांमध्ये जागृती होत असून आतापर्यंत सुमारे 300 गर्भवतींनी (pregnant women) लसीकरणाचा (Vaccination) पहिला डोस घेतला आहे. राज्यात सुमारे 20 हजार गर्भवती महिला आहेत. (First dose of vaccine has been given to 300 pregnant women in Goa)

आरोग्य संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासांत मडगाव येथील 64 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे, तर नवीन 97 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मृत्यू झालेल्या कोरोनाबाधितांची संख्या 3,157 वर पोहचली आहे. विविध आरोग्य केंद्रांवर 4685 जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यातील 17 जणांना इस्पितळात दाखल करण्यात आले तर 80 जणांनी गृह अलगीकरणात राहणे पसंत केले आहे. 133 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील विविध आरोग्य केंद्राच्या कक्षेत राहणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्याही 50 च्या खाली आली आहे.

गोव्यात आतापर्यंत 300 गर्भवतींना पहिला डोस!

लसीकरण मोहिमेला प्रतिसाद

राज्याच्या विविध प्रमुख शहरांमध्ये आज विशेष लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत ज्यांच्याकडे ओळखपत्र नाही त्यांनाही ही लस दिली जाणार आहे. भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांना कोविडसंदर्भातचे प्रशिक्षण 60 डॉक्टरांमार्फत दिले जाणार आहे. यासंदर्भातचा निर्णय भाजप गोवा वैद्यकीय कक्षाच्या बैठकीत झाला आहे.

शाळेचा निर्णय अजूनही नाही

राज्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भातचा निर्णय अजून सरकारने घेतलेला नाही. लसीकरणाचा पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवसांनी दुसरा डोस देण्याचा नियम आहे मात्र ही मुदत शिक्षकांच्या बाबतीत शिथिल करून ती कमी करण्याची परवानगी केंद्र सकारकडे मागण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourist Death: 'आम्ही पॅरासेलिंग करून बोटीवर आलो, जेवलो, काही क्षणांतच...', गोव्यात काय घडले महिलेने घटनाक्रमच सांगितला

Cash For Job Scam: सरकारी नोकरी घोटाळ्याची पोलिसचं चौकशी करणार, सरकार ठाम; संशयितांच्या आवळल्या जातायेत मुसक्या!

Goa Opinion: खराब रस्ते, विस्कळीत वाहतूक व्यवस्था, अमली पदार्थाचे संकट; सुंदर, नितळ गोव्याची 'इमेज' धोक्यात

Goa News Updates: एसटींना आरक्षण मिळवून देण्यासाठी लोकसभेत आवाज उठवणार: विरियातो फर्नांडिस; वाचा दिवसभरातील घडामोडी

Cash For Job Scam: आधी कारवाई 'मोठ्यांवर' हवी ना!

SCROLL FOR NEXT