गेले काही दिवस व्हिसा समस्यांमुळे यूकेमधून गोव्याकडे प्रस्थान करणारी प्रवासी संख्या रोडावली आहे. गोव्याकडे येणाऱ्या प्रवाशांची ऑनलाईन व्हिसा नोंदणी थांबवण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना कार्यालयात येत व्हिसा साठी अर्ज करावा लागत आहे. ‘युके’साठीचा ई-व्हिसा प्रश्न सुटला नसला तरी यूकेमधून पहिले चार्टर 6 नोव्हेंबर रोजी गोव्यात दाखल होणार आहे. (First charter from UK set to arrive in Goa on November 6 )
कोरोना काळात गृह मंत्रालयाने विविध देशांतील ई-व्हिसा निलंबित केले होते. त्यामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचाही (युके) समावेश होता. तो आहे तसाच आहे, ‘युके’मधून मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्यात येतात. सध्या पर्यटन हंगाम सुरू झाल्याने या पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्याची व्हीसा प्रणाली अत्यंत किचकट आणि वेळखाऊ आहे. त्यामुळे अनेक पर्यटकांनी गोव्यात येणे रद्द केले आहे.
एका अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले आहे की, यूकेमधून पहिले चार्टर 6 नोव्हेंबर रोजी गोव्यात दाखल होणार आहे. यासाठी 26 ऑक्टोबर रोजी कझाकस्तानमधील अल्माटी येथून पहिला चार्टर मिळणार आहे. व्हिसा केंद्रांवर अपॉईंटमेंट्स मिळवण्यात येणाऱ्या अडचणींमुळे लोकांनी बुकिंग रद्द करणे सुरू केल्यानंतर उड्डाण संख्या चारवरून एक झाली आहे.
राज्यातील पर्यटनाच्यानिमित्ताने अनेक नागरिकांनी गेल्या दीड वर्षात अनेक वेळा सरकारला विनंती केली आहे की, ज्या देशांच्या नागरिकांना ई-व्हिसा दिला जातो, त्या देशांच्या यादीत यूकेचाही समावेश करावा. मात्र अद्याप हा बदल केला गेला नसल्याने पर्यटक येऊ शकलेले नाहीत. याचा परिणाम म्हणुन गोव्याच्या पर्यटन उद्योगाला 80 ते 100 कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.