Goa Accident Cases Dainik Gomantak
गोवा

Accident In Kundaim: कुंडई येथे ट्रकचा अपघात! जखमींची सुटका करण्यात अग्निशमन दलाला यश

काल रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला असून, अपघातातील व्यक्ती किरकोळ जखमी झाली आहे.

दैनिक गोमन्तक

कुंडई येथे अपघातानंतर ट्रकमध्ये अडकलेल्या व्यक्तीची अग्निशमन दलाने सुटका केली; काल रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला असून, अपघातातील व्यक्ती किरकोळ जखमी झाली आहे. ट्रकवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे. कुंडई हा औद्योगिक परिसर असल्याने याठीकणी अवजड वाहानांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते.

(Firefighters succeed in rescuing the injured in a truck accident at Kundaim)

गोव्यात अपघातांचे सत्र थांबण्यास तयार नाही दोन दिवसांपूर्वी पुन्हा एका चारचाकीचा अपघात झाला असून या अपघातात शिरोड्यातील महिला जागीच ठार झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे समोर आलेल्या माहितीनुसार गोव्यात प्रत्येत 34 तासात एक कुटुंब अपघाताने उद्ध्वस्त होत असल्याचा प्रत्यय येत आहे.

अपघातांचे सत्र थांबेना; शिरोडा येथील कार धडकेत एक जागीच ठार

मिळालेल्या माहितीनुसार फोंडा तालुक्यातील शिरोडा येथे एक चारचाकी वेगाने धडक दिली असल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात उमा उमेश गुरव वय 66 यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच अपघातग्रस्त कारचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी शिरोडा येथील गुरव कुटुंबिय चारचाकी वाहनातून शिरोडा मुख्य मार्गावरुन प्रवास करत होती. यावेळी एका वजनगाळ परिसरातील एका मोठ्या वळणावर गाडी आली असताना एका झाडाला वेगाने धडकली. या धडकेत उमा उमेश गुरव या ठार झाल्या तसेच कुटुंबातील इतर तीन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT