Firefighters help a 72-year-old man who fell into a well

 

Dainik Gomantak 

गोवा

विहिरीत पडलेल्या 72 वर्षीय वृद्धेला अग्निशमन दलाच्या जवानांची मदत

कुडतरी येथे विहरीत पडलेल्या एका 72 वर्षीय वृद्ध महिलेला कुडचडे येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढले.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा : कुडतरी येथे विहरीत पडलेल्या एका 72 वर्षीय वृद्ध महिलेला कुडचडे येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढले. विहरीत या महिलेचे नाव मींगेलिं डिकॉस्ता असे आहे.

हे प्रकरण 4 जानेवारी रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या दरम्यान घडले होते. एक वृद्ध महिला गिरदोली - कुडतरी येथे विहरीत पडल्याची माहिती मिळताच कुडचडे येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन नऊ फूट पर्यंत खोलीच्या विहरीत प्रवेश करून अथक प्रयास करून शिडी आणि दोरीच्या सहायाने या महिलेला सुखरूप बाहेर काढले .

ही महिला विहरीत कशी पडली याविषयी माहिती प्राप्त झाली नाही. तर या ठिकाणी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचे तिला जीवदान दिल्याबद्दल कौतुक होत आहे यात कुडचडे येथील पी. सांगोडकर, आर. एस. गावस, टी. रेकडा ,एस देसाई या जवानांनी या कारवाईत भाग घेतला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "एनडीएला बळ देण्यासाठीच प्रवेश", 7 खासदारांच्या पक्षांतरावर कीर्तीकरांचे विधान

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांसह महिलांना देणार संधी! 'जेनझी'शी राजकीय 'कनेक्ट' गरजेचा- विजय सरदेसाई

Goa Politics: भाजप सरकारचा अहंकार जनता मोडेल! अरविंद केजरीवालांची टीका, कारापूर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा केला निषेध

Section 39A Protest: आता गावागावांतून आंदोलन! कलम '39अ'विरोधात आमदार वीरेश बोरकर यांची घोषणा

SCROLL FOR NEXT