Third Wave of Corona: नवीन वर्षाच्या स्वागतानंतर राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. रुग्णसंख्या वाढू नये यासाठी तज्ज्ञांनी सरकारला नाईट कर्फ्यू (Night Curfew) लावण्यासंदर्भात आवाहन केले होते. पण अद्याप तरी याबाबत सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. पण याच पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत.
एकीकडे सरकारने लसीकरणाचा (Vaccination) वेग वाढवला असला तरी दुसरीकडे कोरोना (Corona) रुग्णसंख्याही तितक्याच झपाट्याने वाढत आहे. आज राज्यात नव्या 592 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळेच आरोग्य संचालक डॉ. आयरा आल्मेदा यांनी जनतेशी संवाद साधून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
गोव्यात 28 डिसेंबर पासून कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली आहे. रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. राज्यातील कोविड पॉझिटिव्हिटी दर 13.89 टक्के इतका आहे. त्यामुळे निवडणुकीदरम्यान गोव्यातील नागरीकांनी कोणत्याही पक्षांच्या जाहीर सभेला जाऊ नये. याउलट स्वत:चे कोरोनापासून रक्षण करण्याचे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.