Goa Fire Brigade and Electricity Department  Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: धुवांधार पावसामुळे अग्निशामक दलाची होतेय दमछाक; राज्यात अनेक ठिकाणी पडझड

Goa Fire Brigade and Electricity Department: वीज पुरवठा सुरळीत राखण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांनाही बरेच कष्ट

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात गेले आठ दहा दिवसांपासून कोसळत असलेल्या धुवांधार पावसामुळे राज्यातील जनजीवन प्रभावित झाले आहे. अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्याने अग्निशामक दलाचीही पूर्ण दमछाक झाली आहे. अनेक ठिकाणी दरडी तसेच काही ठिकाणी घरेही कोसळण्याच्या घटना घडल्या. विविध घटनांत पाच जणांना आपला जीवही गमवावा लागला.

या पावसाचा सर्वाधिक फटका वीज खात्याला बसला आहे. पडझडीमुळे अनेक वीज खांबांसह वाहिन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वीज पुरवठा सुरळीत राखण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांनाही बरेच कष्ट घ्यावे लागले.

अनेक भागात रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक प्रभावित झाली. तसेच काही रस्त्यांचीही वाताहत झाली आहे. विशेषतः ग्रामिण भागातील रस्त्यांची स्थिती खूपच खराब झाली आहे.

या पावसाचा कृषी क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. शेतात तसेच बागायतींत पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. आहे. बागायती पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात पाणी तुंबून असल्याने भात लावणी व अन्य कामे रखडली आहेत.

कुठ्ठाळीत ८० झाडे पडली

संततधार पावसामुळे कोन्सुवा प्रभागामध्ये रस्त्याच्या सुमारे एक किलोमीटरच्या अंतरा दरम्यान दोन्ही बाजूने सुमारे ७० ते ८० झाडे उन्मळून वीज वाहिन्यांबरोबर घराचेही नुकसान झाले. आमदार आंतोन वाझ यांनी घटनास्थळी दाखल होत छत कोसळलेल्या घरमालकाला मदत केली. तसेच अग्निशमन दलाला पाचारण करून रस्ता मोकळा केला. यावेळी सरपंच सेनिया परेरा, पंच फ्रान्सिस व आंजेला फुर्तादो उपस्थित होते.

काणकोण पडझड, खोला पंचायती छप्पर कोसळले

तालुक्यात मोठ्या प्रमाणात पडझड झाली. खोला पंचायतीवरील नव्याने उभारण्यात आलेले लोखंडी पत्र्याचे छप्पर कोसळले. गांवडोंगरी येथे आंब्याचे झाड रस्त्यावर पडून वाहतूक काही काळ बंद राहिली. गाळये- पैंगीण येथील उमेश कामत यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून नुकसान झाले. पाळोळे येथे रस्त्यावर झाड पडून वाहतुकीस अडथळा झाला. जांभळीमळ-श्रीस्थळ येथे घरावर झाड कोसळून घराची पांच हजारांचे नुकसान झाले. पाटोळे येथे डॉ.धिल्लन देसाई यांच्या घरावर माड पडून सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. देवाबाग येथे माड रस्त्यावर पडून रहदारीला अडथळा झाला. अग्निशामक केंद्राचे कर्मचाऱ्यांनी अडथळे दूर केले, असे केंद्र प्रमुख धिरज देसाई यांनी सांगितले.

तांबोसे महामार्गावर पडलेली झाडे हटविली

तांबोसे येथील राष्ट्रीय महामार्ग ६६ व सर्व्हीस रोडवर पडलेली झाडे पेडणे अग्निशामक दलाने हटविली. यावेळी दलाचे सहाय्यक अधिकारी प्रशांत धारगळकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालक प्रमोद गवंडी, हवालदार फटू नाईक, मातीयास मेंडोसा, राजेश परब, अमित सावल, संकल्प शेट्ये, श्याम आरोंदेकर, यशवंत नाईक यांनी या मोहिमेत भाग घेतला.

होंडात पडझडीच्या अनेक घटना

होंडा परिसरात नागरी पुरवठा खात्याच्या दोन गोदामाचे छप्पर उडून जाण्याच्या घटनेसह अनेक ठिकाणी पडझड झाली. पोस्तवाडा येथील महेश गावस यांच्या घराचे संपूर्ण छप्पर उडून गेले. छप्पर उडून गेल्याने पावसाचे पाणी घुसून घरातील सर्व साहित्य खराब झाले. सध्या त्यांना इतरांच्या घरी आसरा घेण्याची वेळ आली आहे. त्यांचे सुमारे तीन लाख रुपये नुकसान झाल्याची माहिती तलाठी संतोष गावस यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT