Dump fire Dainik Gomantak
गोवा

Colvale: 24 तास उलटूनही कोलवाळ भंगारअड्ड्यांची आग आटोक्यात नाहीच

Colvale: या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात विषारी धूर पसरला आहे.

दैनिक गोमन्तक

Colvale: आग लागून चार भंगारअड्डे जळून पूर्णतः खाक झाले. तरी 24 तास उलटूनही ही आग अजूनही धुमसते. या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर सुरू होते. हे चारही दुर्घटनाग्रस्त अड्डे 8 हजार चौ.मी. जागेत पसरल्याने जवानांना प्रचंड मेहनत घ्यावी लागली. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात विषारी धूर पसरला आहे.

मूशीरवाडा येथे भंगारअड्ड्यांना लागलेल्या आगीवर गोवा अग्निशमन दलाने सध्या 80 टक्के नियंत्रण मिळविले. ही आग विझविण्यासाठी आतापर्यंत 3.5 लाख लिटर पाण्याचा वापर केल्याची माहिती गोवा अग्निशमन दलाचे संचालक नितीन रायकर यांनी घटनास्थळी दिली. यावेळी म्हापसा अग्निशमन दलाचे प्रभारी बॉस्को फेर्राव हेही उपस्थित होते.

नितीन रायकर म्हणाले, या आगीची भीषणता मोठी असल्याने म्हापसा, पिळर्ण, पर्वरी, पेडणे तसेच पणजी मुख्यालयातून वाहने घटनास्थळी कार्यरत होती. या भंगारअड्ड्यांमध्ये दाटीवाटीने मोठ्या प्रमाणात निरुपयोगी साहित्याचा खच भरलेला होता. ज्यात टायर, बॅरल्स, ड्रम्स, खराब गॅस सिलिंडरचे खोके, एसी संच, गाद्या आदींचा समावेश होता.

सध्या आग बऱ्यापैकी नियंत्रणात आणली असून आतापर्यंत 3 लाख 50 हजार लीटर पाणी वापरले गेले. तसेच ग्लेनमार्क, बिनानी या आद्यौगिक कंपनींकडून पाणीपुरवठा करण्यात आला,

शिवाय या भंगारअड्ड्याच्या मालकाने जेसीबी, मातीचा भराव व टँकरची व्यवस्था केली. सर्वांची साथ लाभल्याने दलाने ही आग जवळपास 80 टक्के आटोक्यात आणली. संपूर्ण आग नियंत्रणात आणल्यानंतरच आम्ही घटनास्थळावरून माघारी परतणार, असेही रायकर म्हणाले.

मातीचा भराव टाकण्याचे काम सुरू

चार भंगारअड्ड्यांना बुधवारी सकाळी 10.30च्या सुमारास ही आग लागली होती. वेल्डिंगचे काम सुरू असताना ठिणगी पडल्याने ही आग पसरली. ही आग दुसऱ्या दिवशीही धुमसत होती. यावेळी जेसीबीच्या सहाय्याने या अड्ड्यामधील साहित्य विखरून दलाच्या जवानांकडून त्यावर पाणी मारण्याचे काम सुरूच होते.

जवानांनी अहोरात्र घटनास्थळी थांबवून ही आग शेजारील निवासी वसाहतींमध्ये पसरू नये, याची दक्षता घेतली. या शिवाय धुमसणारी आग पूर्णपणे विझविण्यासाठी ट्रकमधून मातीचे भराव घटनास्थळी आणले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT