Fire In Goa Dainik Gomantak
गोवा

Fire In Goa: राज्यात दोन ठिकाणी आगीच्या घटना; घरासह काजूची बाग खाक

फुंटेमळ उगे येथे एका घराला आग, म्हावळींगे येथील 'चारमाळो' पठारावर आग

गोमन्तक डिजिटल टीम

Fire In Goa: फुंटेमळ उगे येथे एका घराला आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना सकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली तर म्हावळींगे येथील 'चारमाळो' या पठारालाही आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत शेकडो काजूची झाडे जळून खाक झाली.

फुंटेमळ उगे येथे आज एका घराला सकाळी 4 वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग पेद्रीना डायस यांच्या घराला लागली. या आगीत दोन लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. पेद्रीना डायस व त्यांची मुले फुंटेमळ उगे येथे एका झोपडीत राहत होते.

पेद्रीना डायस सामान ठेवत असलेल्या झोपडीला सकाळी 4 वाजण्याच्या सुमारास आग लागली. आग विझवण्याचे प्रयत्न स्थानिकांनी केले परंतु आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश न आल्याने घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या.

पेद्रीना व त्यांची मुले त्याच झोपडीच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या झोपडीत झोपत होते. या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. आगीत कागदपत्रे तसेच घरातील साहित्य जळून खाक झाल्याने पेद्रीना डायस यांनी सरकारडे मदतीची मागणी केली आहे. तसेच संबंधित कुटुंब हे गरिब कुटुंब असल्याने सरकारने कुटुंबाला मदत करावी अशी मागणी येथील स्थानिकांनीही केली आहे.

तर दुसरी आगीची घटना म्हावळींगे येथील 'चारमाळो' या पठारावर घडली. आगीची ही घटना काल (गुरुवारी) घडली. या आगीत तुळशीदास गावकर, अभित परवार यांच्यासह अन्य काजू बागायतदारांचे नुकसान झाले आहे.

ऐन काजू हंगामाच्या प्रारंभीच काजूची झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने काजू बागायतदार हवालदिल बनले आहेत. काल सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास 'नेस्ले' कंपनीच्या मागच्या बाजूने पठाराला आग लागली.

माहिती मिळताच डिचोली अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. लिडींग फायर फायटर राजन परब यांच्या नेतृत्वाखाली दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करुन दुपारी पावणेतीन वाजेपर्यंत आग नियंत्रणात आणली. आग नेमकी कशी लागली, त्याचे नेमके कारण समजू शकले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT