Fire in Wine Shop Dainik Gomantak
गोवा

मोलेत वाईन शॉप जळून खाक, लाखोंचं नुकसान

शॉर्टसर्किटमुळे वाईन शॉपला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

दैनिक गोमन्तक

धारबांदोडा : मोले येथील एका वाईन शॉपमध्ये अग्नितांडव पाहायला मिळालं आहे. प्रसाद वाईन शॉप असं या दुकानाचं नाव असून आग लागून सुमारे सात लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून सदर घटना मंगळवारी घडली आहे. (Fire in Wine Shop News Updates)

वाईन शॉपला लागलेल्या आगीत दारुच्या बाटल्या, लॅपटॉप, रेफ्रिजरेटर आणि इतर सामान जळून खाक झाले आहे. फोंडा येथून अग्निशमन दलाला (Fire Brigade) तातडीने याची माहिती देण्यात आली. मात्र अग्निशमन दल दाखल होईपर्यंत दुकान जळून खाक झालं होतं. दुकानाच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार अंदाजे सात लाखांचा दुकानातील माल जळून खाक झाला आहे.

दरम्यान गोव्यात आगीच्या घटना सातत्याने वाढतानाच दिसत आहेत. फातोर्डा (Fatorda) येथील कोलवा जंक्शन सर्कल जवळ सोमवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास चारचाकी वाहनाला आग (Fire) लागली. गाडीतील प्रवाशांनी प्रसंगावधान राखत वेळीच बाहेर धाव घेतल्याने जीवितहानी टळली, मात्र यात गाडीचं मोठं नुकसान झालं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT