Yash Shooting Hub Fire Incident  Dainik Gomantak
गोवा

Mandrem Fire Incident: मांद्रेतील यश शूटिंग हबमध्ये आग; ३५ ते ४० लाख रुपयांचे नुकसान

Yash Shooting Hub: रायफल शूटिंगच्या विविध रेंजच्या बंदुका, पिस्तूल, काडतुसे, गोळ्या, तसेच टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, लॅपटॉप इत्यादी किमती साहित्य आगीच्या भक्षस्थानी

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी: मांद्रे येथील यश शूटिंग अकादमीच्या यश शूटिंग हबला रविवारी पहाटे पाचच्या सुमारास शॉट सर्किटमुळे आग लागल्याने सुमारे ३५ ते ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मालक योगेश्वर शिवा पाडलोस्कर यांनी दिली. मात्र या ठिकाणी १८ ते २८ ऑगस्ट दरम्यान होऊ घातलेल्या खुल्या गटातील राष्ट्रीय शूटिंग स्पर्धा ठरल्या प्रमाणेच होणार असून यात सुमारे ५ हजार खेळाडू सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या आगीत सर्वर रूम, तसेच मुख्य खोलीत ठेवलेली रायफल शूटिंगच्या विविध रेंजच्या बंदुका, पिस्तूल, काडतुसे, गोळ्या, तसेच टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, लॅपटॉप इत्यादी किमती साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले. १० पेक्षा जास्त बंदुका होत्या. त्याची प्रत्येकाची किंमत ३ ते १० लाख इतकी असल्याचे त्यांनी सांगितले.

पाडलोस्कर यांनी सांगितले की, मी माझ्या करासवाडा, म्हापसा येथील निवासस्थानी झोपलो असताना यश शूटिंग अकादमीतील सुरक्षारक्षकाने रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास संपर्क साधून आग लागल्याची माहिती दिली. आम्ही लगेच अग्निशमन दलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.

लागलीच आम्ही घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान अग्निशमन दलाशी संपर्क झाला. आम्ही घटनास्थळी पोचल्यानंतर अग्निशमन दलाची गाडी पोचली. परंतु तोपर्यंत सगळे आगीच्या भक्षस्थानी पडले होते. त्यानंतर आम्ही व अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविली, मात्र तोवर लाखो रुपयांचे नुकसान झाले.

मांद्रे पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक परेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल सतीश शेट्ये यांनी या दुर्घटनेचा पंचनामा केला.

राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेवर परिणाम नाही

गोव्याला पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांतील रायफल शूटिंग स्पर्धा याच ठिकाणी घेण्यात आल्या होत्या. आता पुन्हा एकदा या ठिकाणी राष्ट्रीय शूटिंग स्पर्धा घेण्यास आम्ही सज्ज आहोत. या आगीचा या स्पर्धांवर अजिबात परिणाम होणार नाही, असे त्या म्हणाल्या.

शूटिंग रेंज सुरक्षित

या अकादमीच्या प्रमुख तथा प्रशिक्षक भाग्यश्री पडलोस्कर म्हणाल्या की, आगीत यश शूटिंग अकादमीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असले तरी ज्या ठिकाणी रायफल किंवा अन्य शूटिंग स्पर्धा घेतल्या जातात ती शूटिंग रेंज सुरक्षित आहे. त्यामुळे १८ ते २८ ऑगस्ट दरम्यान गोव्यात प्रथमच होणाऱ्या खुल्या गटातील शूटिंग स्पर्धा ठरल्या वेळेत पार पडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यात ४५०० पेक्षा जास्त खेळाडूंनी नाव नोंदणी केली आहे, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

SCROLL FOR NEXT