Fire Brigade Building : मडगाव अग्निशमन दल इमारतीची दुरुस्ती करा; सर्व ठिकाणी गळती

Fire Brigade Building : कर्मचाऱ्यांचा जीवही धोक्याच्या सावटाखाली
Fire Brigade Building
Fire Brigade BuildingDainik Gomantak
Published on
Updated on

फातोर्डा, मडगाव अग्निशमन दल केंद्राच्‍या इमारतीला दुरुस्तीची नितांत गरज आहे. ही इमारत २५ वर्षांपूर्वीची आहे.

संपूर्ण इमारतीत पावसाळ्यात अनेक ठिकाणी गळती होत आहे. आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार विनंती करूनही, केवळ तात्पुरते पॅचवर्क करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांचा जीवही धोक्याच्या सावटाखाली आला आहे.

या प्रकरणी मडगाव अग्निशमन दल केंद्राचे उपसंचालक राजेंद्र हळदणकर म्हणाले, आम्ही पीडब्ल्यूडीला आवश्यक दुरुस्तीच्या कामांबाबत सातत्याने पत्रे लिहिली आहेत. त्यांनी काही पॅचवर्क केले आहे, परंतु इमारतीत होत असलेली गळती अद्याप थांबलेली नाही. आम्ही इमारतीचे विद्युतीकरण बदलण्यासाठी याचिकाही केली आहे.

Fire Brigade Building
Hepatitis B and C: 3.5 कोटी भारतीयांना धोका! WHO चा धक्कादायक रिपोर्ट; अशी ओळखा लक्षणे

समाजसेवक अँड्र्यू सिक्वेरा यांनी इमारतीच्या बिघडलेल्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, अग्निशमन केंद्राची अवस्था पाहून खूप वाईट वाटते. अग्निशमन दलाचे जवान इमारतीखाली बांधलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्या ठेवत आहेत.

प्रत्येक आपत्तीतून अग्निशमन विभाग आम्हाला वाचवतो, आपत्कालीन व्यवस्था जनतेच्या सेवेसाठी धावून जात असतात. पण त्यांच्याच इमारतीला सध्या धोका निर्माण झाला आहे. सरकारच्या निष्काळजीपणा आणि देखभालीचा अभाव याचा हा परिणाम आहे.

या जीर्ण झालेल्या इमारतींमुळे त्यांच्याच जिवाला धोका निर्माण झाला आहे, असे सिक्वेरा यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com