fire in Cashew Dainik Gomantak
गोवा

रावण येथील भागात काजू बागायतीला आग

काजू बागायतीला आग लागून काजूची झाडे आणि कलमे जाळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले

दैनिक गोमन्तक

पर्ये: रावण - पेळावदा भागातील डोंगर टेकड्यावरील काजू बागायतीला आग लागून काजूची झाडे व कलमे जाळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. येथील यशवंत कामत, गुरुदास कामत, श्रीपाद कामत यांच्या काजू बागायतींना आज (रविवारी) दुपारी आग लागली. जमीन धारकांना माहिती मिळताच त्यांनी डोंगरावर जाऊन अथक प्रयत्नाने आग विझवण्यास यश मिळवले.

त्यामुळे आणखी मोठी आर्थिक हानी टळली. आग आटोक्यात येईपर्यंत आगीच्या भडक्यात सुमारे एक हेक्टर जागेतील काजूची झाडे व नवीन काजू कलमांची लागवड जाळून खाक झाली.

सध्या काजू हंगामाला सुरवात झाली होती. या आगीच्या भडक्यात संपूर्ण काजू लागवड नष्ट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Childhood Depression: स्मार्टफोन आणि नैराश्य

Goa Monsoon: गोव्यात मान्सूनचे आगमन; हवामान विभागाडून चार दिवसांचा 'यलो अलर्ट'!

मालपे येथील संरक्षक भिंत पुन्हा धोक्यात; पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करण्याची स्थानिकांची मागणी

Goa Power Cuts: हसापूर, हणखणेतील वीज समस्या सोडवा; काँग्रेस कार्यकर्त्यांची वीज कार्यालयावर धडक, साहाय्यक अभियंत्यांशी चर्चा

Hasapur Bridge: हसापूर पूल महिन्याभरात वाहतुकीस खुला; काँक्रीटचे काम पूर्ण

SCROLL FOR NEXT