Illegal Sand Mining Dainik Gomantak
गोवा

Kajumal Mollem: रेती उपसाप्रकरणी तक्रार नोंद करून घेण्यास विलंब का? काजूमळ स्थानिकांची चौकशीची मागणी

Kajumal Mollem Illegal Sand Mining: काजूमळ-पेरीमळ येथील बेकायदेशीर रेती उपसा प्रकरणात अखेर सहा दिवसांनी अज्ञाताविरुद्ध तक्रार नोंद करण्यात आली आहे. तक्रार दाखल करण्यास एवढ्या दिवसांचा विलंब का? याची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Kajumal Mollem Illegal Sand Mining

फोंडा: काजूमळ-पेरीमळ येथील बेकायदेशीर रेती उपसा प्रकरणात अखेर सहा दिवसांनी अज्ञाताविरुद्ध तक्रार नोंद करण्यात आली आहे. तक्रार दाखल करण्यास एवढ्या दिवसांचा विलंब का? याची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धारबांदोडाचे मामलेदार प्रतापराव नाईक गावकर यांनी आज दुपारी २.३५ वाजता मोले पंचायत क्षेत्रात काजूमळ-पेरीमळ येथे नदीच्या काठी अज्ञातांनी मोठ्या प्रमाणात रेती उपसा केल्याची तक्रार नोंदविली आहे. त्यानुसार कुळे पोलिस स्थानक उपनिरीक्षक विराज कोरगावकर यांनी तक्रार नोंद करून घेतलेली आहे.

शुक्रवारी जेव्हा मामलेदारांनी त्या ठिकाणी भेट दिली तेव्हा त्यांना रेती उपसा करून नदीकाठी साठवून ठेवल्याचे आढळून आले होते. त्यानुसार त्यांनी या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवावा, असे कुळे पोलिस निरीक्षक राघोबा कामत यांना सांगितले होते. त्यानुसार त्या ठिकाणी शनिवारी पोलिस बंदोबस्त ठेवला होता; पण शुक्रवारीच अज्ञात व्यक्ती रेतीचे दोन ढिगारे गायब करण्यास यशस्वी ठरले होते. तक्रार नोंद करून घेण्यास विलंब लावला, यामागे कुणाचा आशीर्वाद आहे. याची चौकशी संबंधित पोलिस खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी, अशी मागणी होत आहे.

पोलिस तक्रार दाखल करू शकतात!

बेकायदेशीरपणे कुणी रेती वगैरे काढतात, याची चाहूल स्थानिक पोलिस यंत्रणेला लागली तर पोलिस निरीक्षकांना तक्रार नोंद करून घ्यावीच लागते. मामलेदारांकडूनच तक्रार दाखल करावी, असे होत नाही. तक्रार दाखल करण्यास विलंब का झाला, हे मला माहिती नाही. या दोन दिवसांत खाण खात्याच्या अधिकाऱ्यांना घेऊन आपण स्वत: रेती उपसा होत आहे तिथे भेट देणार असल्याचे धारबांदोडाचे मामलेदार प्रतापराव नाईक गांवकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT