LOP Yuri Alemao, Amit Patkar In Panaji Protest Dainik Gomantak
गोवा

'रामा'च्या न्यायासाठी पणजीत काढलेला मोर्चा अवैध असल्याचा आरोप; युरी आलेमाव, विजय सरदेसाई यांच्यासह 450 जणांविरोधात गुन्हा

Goa Crime News: पणजी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

Pramod Yadav

पणजी: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि न्यायाच्या मागणीसाठी पणजीत काढलेला भव्य मोर्चा बेकायदा असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पणजी पोलिसांनी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार विजय सरदेसाई, वीरेश बोरकर, व्हेंझी व्हिएगस यांच्यासह ४५० जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ १९ सप्टेंबर रोजी विरोधी पक्षातील नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्ये आणि नागिरकांनी पणजीत भव्य मोर्चा काढला होता. हा मोर्चा बेकायदा असल्याचा आरोप करत पणजी पोलिसांनी आता याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

मोर्चासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती असा आरोप करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

राज्याच्या वतीने मी ही तक्रार दाखल करत असून, परवानगी न घेता राजधानीत बेकायदा जमाव जमून मोर्चा काढण्यात आला, असे चोडणकर यांनी म्हटले आहे.

आप नेते अमित पालेकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आरजीचे प्रमुख मनोज परब, अंजली निंबाळकर, भंडारी समाजाचे प्रमुख संजू नाईक, गोकुवेदचे गोविंद शिरोडकर माजी आमदार प्रसाद गावकर, प्रकाश वेळीप, गिरीश चोडणर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार विजय सरदेसाई, वीरेश बोरकर, व्हेंझी व्हिएगस यांच्यासह ४५० जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

१९ सप्टेंबर रोजी पणजीतील आझाद मैदानात रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ल्याच्या निषेर्धात निदर्शने करण्यात आली. यानंतर जमावाने पोलिस मुख्यालयाला धडक दिली. यावेळी जमावाने सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यानंतर आंदोलकांनी मुख्यमंत्री सावंत यांच्या अल्तिनो येखील घराबाहेर गर्दी केली. यावेळी काही आंदोलकांनी भाजपच्या कार्यालात देखील जाण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी दाखल केलेल्या या गुन्ह्याचा विजय सरदेसाईंनी निषेध नोंदवला आहे. "गुन्हा गोमंतकीयांना शांत करणार नाही ते फक्त भाजपची भीती दाखवतात. भाजप सरकारला वाटतंय की, एफआयआर मला, विरोधी पक्षातील आमदारांना आणि अन्यायाविरुद्ध उभे राहिलेल्या ४५० धाडसी गोएमकरांना घाबरवू शकतात. पण आमचा आवाज दाबला जाऊ शकत नाही. खरंतर गुंडराज, अहंकार आणि लोकशाहीचा विश्वासघात करणाऱ्यांविरोधात गोमंतकीय गुन्हा नोंदवतील", असे विजय सरदेसाईंनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI: विंडीजची शरणागती! 146 धावांवर ऑल आऊट, टीम इंडियाने अहमदाबाद कसोटी एक डाव आणि 140 धावांनी जिंकली

Goa Politics: भाजपला हरवण्यासाठी 'नवा फॉर्म्युला'! RGPने उघडले युतीचे दरवाजे; गोव्याच्या राजकारणात मोठा बदल?

Codar: 'पूर्वी खांडोळा गावात मोठी वनराई होती, ती कापून त्यावर शहर बनवले'; कोडार आणि आयआयटीचा गोंधळ

अग्रलेख: धारगळ की वन म्हावळिंगे? भिजत घोंगडे; वेर्ण्यात उभारलेले सुसज्ज क्रिकेट मैदान

Rajmata Jijabai Karandak: अखेरच्या 10 मिनिटांत 2 गोल! गोव्याच्या महिलांना पराभवाचा धक्का; 'देविका' छत्तीसगडच्या विजयाची शिल्पकार

SCROLL FOR NEXT