Anjuna Hotel Waste Water Dainik Gomantak
गोवा

Anjuna: नाल्यात सांडपाणी सोडल्याबद्दल फाईव्ह स्टार हॉटेलला दहा हजारांचा दंड; हणजुण येथील प्रकार

Anjuna Hotel Sewage Issue: हॉटेल कॉन्टिनेन्टच्या व्यवस्थापनाकडून गेले कित्येक दिवस तेथील सांडपाणी खुलेआम रस्त्याच्या नाल्यात सोडले जात असल्याची रीतसर तक्रार दाखल करण्यात आली होती.

Sameer Panditrao

कळंगुट: गुमालवाडा -हणजुण येथील एका पंचतारांकित हॉटेलचे सांडपाणी खुलेआम रस्त्याशेजारच्या नाल्यात सोडले जात असल्याच्या तक्रारीमुळे मंगळवारी दुपारी हणजुण-कायसुव पंचायतीचे सरपंच लक्ष्मीदास चिमुलकर यांनी येथील हॉटेलची पाहणी करण्यात आली. यावेळी हॉटेल व्यवस्थापन दोषी आढळल्याने त्यांना दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती सरपंच चिमुलकर यांनी प्रसार माध्यमांना दिली.

हणजुण-कायसुवचे पंच सुरेंद्र गोवेकर तसेच तक्रारदार अँन्थोनी डिसोझा व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संबंधित हॉटेल कॉन्टिनेन्टच्या व्यवस्थापनाकडून गेले कित्येक दिवस तेथील सांडपाणी खुलेआम रस्त्याच्या नाल्यात सोडले जात असल्याची रीतसर तक्रार ॲँथोनी डिसोझा व ग्रामस्थांकडून स्थानिक हणजुण -कायसुव पंचायत, शिवोली आरोग्य केंद्र तसेच हणजुण पोलिसांत दाखल करण्यात आली होती.

तक्रारीची दखल घेत हणजुणचे सरपंच लक्ष्मीदास चिमुलकर यांच्या नेतृत्वाखाली पंच सदस्य सुरेंद्र गोवेकर तसेच ग्रामस्थांनी येथील परिसराची पाहाणी केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत सरपंच लक्ष्मीदास चिमुलकर तसेच पंचायत सचिवांकडून हॉटेल व्यवस्थापनास तात्काळ दहा हजारांचा दंड ठोठावण्याबरोबरच तेथील नाला साफ करून देण्याची अट घालण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अग्रलेख: ज्या स्वातंत्र्यासाठी गोमंतकीयांनी रक्त सांडले, त्याच 'गोव्यात' आज मूळ गोमंतकीयांना जगण्यासाठी देश सोडावा लागत आहे..

Goa News Live: गोवा इतर राज्यांच्या तुलनेत खूप पुढे; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Goa ZP Election: भाजप-मगोसमोर भाटीकरांचे आव्हान? कुर्टी झेडपीसाठी ‘आप’सह काँग्रेसही रिंगणात; फोंडा पोटनिवडणुकीवर डोळा

Goa Politics: खरी कुजबुज; रवी पुत्रांचा अप्रत्यक्ष इशारा!

'मृतांमध्ये आमच्या 20 कर्मचाऱ्यांचा जीव गेला याचे दुःख'! लुथरा बंधूंनी पोलिसांसमोर मांडली बाजू; महिन्याला 25 लाख हफ्ता देत असल्याची चर्चा

SCROLL FOR NEXT