Anjuna Night Club Issue: नाईट क्लब, मेगा इव्हेंटचा विषय पुन्हा तापला! हणजूण ग्रामसभेत दोन गटांत 'धुमश्‍चक्री'

Mega Events, Night Club, Noise Pollution: ध्वनी प्रदूषण, मेगा इव्हेंट्स आणि नवीन प्रस्तावित नाईट क्लबचा मुद्दा रविवारी हणजूण-कायसूव ग्रामसभेत गाजला.
Anjuna Gramsabha: मेगा इव्हेंट, नाईट क्लबचा विषय तापला! हणजूण ग्रामसभेत दोन गटांमध्ये 'धुमश्‍चक्री'
Night ClubCanva
Published on
Updated on

म्हापसा: ध्वनी प्रदूषण, मेगा इव्हेंट्स आणि नवीन प्रस्तावित नाईट क्लबचा मुद्दा रविवारी हणजूण-कायसूव ग्रामसभेत गाजला. मेगा इव्हेंट्सच्या मुद्द्यावरून दोन गटांमध्ये जोरदार वादावादी झाली. एका गटाने मोठ्या आवाजातील संगीत आणि वाहतूक कोंडीबद्दल चिंता व्यक्त केली, तर दुसरा गट पर्यटन व्यवसायावर होणाऱ्या परिणामांवर बोलला.

ही ग्रामसभा सरपंच लक्ष्मीदास चिमुलकर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत सचिव आणि पंचसदस्यांच्या उपस्थितीत पार पडली. मेगा इव्हेंटच्या मुद्द्यावर, एका रहिवाशाने सांगितले की आम्हाला वागातोरमध्ये मेगा इव्हेंट नको आहेत. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. येथे कर्णकर्कश संगीत आणि वाहतूक कोंडी यासारख्या समस्याही आहेत.

Anjuna Gramsabha: मेगा इव्हेंट, नाईट क्लबचा विषय तापला! हणजूण ग्रामसभेत दोन गटांमध्ये 'धुमश्‍चक्री'
Music Events Controversy: हणजूण मारहाण प्रकरण चिघळले; दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात तक्रार दाखल!

रात्री उशिरापर्यंत होणाऱ्या पार्ट्या आणि मोठ्या आवाजातील संगीताबद्दल चिंता व्यक्त करताना स्थानिक रहिवासी जेनेट म्हणाली की ‘पूर्वी जंगलात रेव्ह पार्ट्या केली जायची. त्यामुळे कोणाला त्रास होत नव्हता. मात्र, आता ती रहिवासी भागात केली जाते. परिणामी स्थानिकांना त्रास सहन करावा लागत आहे. २० वर्षांपूर्वी ॲम्प्लीफायर वापरले जात होते; परंतु आजकाल आधुनिक तंत्रज्ञानाने बनविलेल्या साऊंड सिस्टिमचा खूप त्रास सहन करावा लागत आहे.

आणखी एक ग्रामस्थ जेरेमी फरेरा यांनी निवासी क्षेत्रात प्रस्तावित नवीन नाईट क्लबचा मुद्दा उपस्थित करीत सांगितले की, पंचायतीने इनडोअर रेस्टॉरंट आणि बारसाठी तात्पुरती एनओसी जारी केली आहे; तथापि प्रकल्पाच्या मांडणीवरून स्पष्टपणे दिसून येते की, हा एक क्लब आहे आणि पंचायतीने कारवाई करावी. ते म्हणाले की, ध्वनी प्रदूषण (Noise Pollution), वाहतूक कोंडी आणि सुरक्षेसारख्या समस्या उद्‌भवतील. यावर सरपंच चिमुलकर म्हणाले की, या प्रकारांची स्वेच्छा दखल घेऊन पंचायत प्रस्तावित परिसराची पाहणी करेल आणि योग्य ती कारवाई करेल.

Anjuna Gramsabha: मेगा इव्हेंट, नाईट क्लबचा विषय तापला! हणजूण ग्रामसभेत दोन गटांमध्ये 'धुमश्‍चक्री'
Taleigao Gramsabha Meeting : ‘तो’ बांधकाम परवाना मागे घ्या! ताळगाव ग्रामसभेत काही ग्रामस्थांची हुल्लडबाजी; पाणीप्रश्नाकडे वेधले लक्ष

मेगा इव्हेंट्सवर विशेष बैठक

या प्रश्नाला उत्तर देताना सरपंच चिमुलकर म्हणाले की, आम्ही मेगा इव्हेंट्सवर विशेष बैठक घेणार आहोत. लाऊड म्युझिकवर लोकांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्यासाठी अनेक पत्रे लिहिली आहेत. या अधिकाऱ्यांनी त्यावर कारवाई करावी आणि संबंधितांवर एफआयआर (FIR) नोंदवावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com